नाते निवडणुकीपुरते न राहता कायम राहील : सौ.वेदांतिका ताई धैर्यशील माने

बांबवडे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे तरुण तडफदार आणि अभ्यासू उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ बांबवडे परिसरातून पदयात्रा संपन्न झाली. या पदयात्रेत धैर्यशील माने यांच्या सुविद्य पत्नी सौ. वेदांतिका ताई सहभागी झाल्या होत्या. घरोघरी जावून हळदीकुंकू समारंभ घेवून आया-बहिणींची त्यांनी विचारपूस केली. त्याचबरोबर धैर्यशील माने यांची पुस्तिका घरोघरी देवून, मतदारांना भेटल्या.

आपण नवीन आहोत,पण जनतेने, शेतकरी बांधवांनी सहकार्य केल्यास, निश्चितच या मतदारसंघासाठी धैर्यशील दादांनी नियोजन केले आहे. भविष्यात केवळ ऊस दर, आणि दुध दर यावर मर्यादित न राहता औद्योगिकरण , शेतीसाठी पाणीपुरवठा आदी योजना अमलात आणल्या जातील, याविषयी खात्री बाळगा. हे नाते केवळ निवडणुकीपुरते न राहता भविष्यात कायमपणे आपले नाते राहील, असे सौ.वेदांतिका ताई यांनी महिलांशी बोलताना सांगितले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गिरी, सुरेश नारकर, मेजर रवंदे, तुषार पाटील, पांडुरंग निकम,सौ सुवर्णा दाभोळकर, अलका भालेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: