शाहूवाडी तालुक्यातील ” त्या ” दोन मागासवर्गीय संस्थांची सुद्धा वसुली होणार का ?

बांबवडे : मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने अनेक औद्योगिक मागासवर्गीय संस्थांना अनुदान सहित कर्जस्वरूपात सहकार्य केले होते. पण जिल्ह्यातील अनेक संस्थांनी मिळालेल्या रकमेपैकी काहीच परतावा केलेला नाही. त्यामुळे संबंधित संस्था अडचणीत आल्या आहेत. पैकी शाहूवाडी तालुक्यातील दोन संस्थांचा देखील यात अंतर्भाव आहे. यामुळे खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गावर निघालेल्या मागासवर्गीय समाजाला धूर्त मंडळींनी अडचणीत आणले आहे.

अशा संस्थांवर कडक कारवाई होणे,हि काळाची गरज आहे. कारण समाजकल्याण विभागाने मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी अनुदानासहित कर्ज दिले. त्यापैकी अनुदानाचा हफ्तासुधा संस्थेच्या संचालक मंडळाला दिला होता, परंतु सदर  रकमेचा विनियोग संस्थेने योग्य कामासाठी केलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या किंवा अशा कोणत्याही संस्थेवर  शासनाने कठोर कारवाई करावी,कारण समाज उत्थानासाठी मिळालेला निधी समाजाच्या कामासाठीच वापरला गेला पाहिजे.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: