कोल्हापूर येथील रमणमळा इथं २३ हजार किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

बांबवडे :कोल्हापूर येथील रमणमळा येथील शिवतेज रेसिडेन्सी बंगला नं. १ येथील दरवाजाची कुलुपे कापून सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम ,असा सुमारे २३,५००/- मुद्देमाल चोरीस गेला असल्याची फिर्याद दीपक बाजीराव बंडगर वय २६ वर्षे यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.५ मे ते ११ मे च्या दरम्यान बंगल्याची कुलुपे कापून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. यामध्ये १००००/- रु. किमतीची अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी, १००००/-रु. किमतीची अर्धा तोळ्याची सोन्याची बुगडी,व ३,५००/-रु. रोख रक्कम असा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला आहे.

याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बांबळे करीत आहेत.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: