पाटणे येथील दामू पाटील खून प्रकरणी गुंगा पाटील यास अटक

बांबवडे : पाटणे तालुका शाहूवाडी येथील दामू महिपती पाटील यांच्या खून प्रकरणी गुंगा पांडुरंग पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दि.१० मे रोजी शेतात मशागत करण्यास जात असलेल्या श्रीपती दामू पाटील यास गुंगा पाटील याने माझ्या अंगावर बैलं घालतोस काय ? असे म्हणत शिवीगाळ केली आणि त्यास खोरे व विळ्याने मारहाण केली,यात श्रीपती जखमी झाला. दरम्यान त्यांचे वडील दामू महिपती पाटील हे भांडण सोडवण्यास गेले असता, त्यांच्या डोक्यात खोरे मारल्याने ते गंभीर जखमी झाले. अति रक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी उशिरा पोलिसांनी गुंगा पांडुरंग पाटील यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास शाहूवाडी पोलीस करीत आहेत.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: