मुजोर अवैध व्यावसायिकाकडून पत्रकारास धमकी

बांबवडे : अवैध व्यावसायिकाकडून पत्रकारास अर्वाच्य भाषा वापरून जीवे मारण्याची धमकी दिल्यासंदर्भात शाहूवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि,वारणा कापशी तालुका शाहूवाडी येथील मधुकर केशव जामदार याने येथील पत्रकार आनंदराव केसरे यांना बातमी छापून आणल्याच्या रागातून अर्वाच्य भाषा वापरून जीवे मारणेची धमकी दिली आहे,अशा आशयाची तक्रार अर्ज आनंदराव केसरे यांनी सर्व पत्रकारांसाहित सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांना दिला. याबाबत पोलीस सूत्रांनी कडक कारवाई करावी,अशी अपेक्षा सर्व पत्रकारांनी केली आहे.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सी.एम.मुदुगडे, मुकुंद पवार, संजय पाटील, अनिल पाटील, उमेश नांगरे, रमेश डोंगरे राजू कांबळे, संतोष कुंभार, संजय पोवार, आनंदा पाटील, दिग्विजय कुंभार,इस्माईल महात,आदी पत्रकार उपस्थित होते.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: