बौध्द विकास मंडळ (परखंदळे ) मुंबई चा हिरक महोत्सवी जयंती सोहळा

बांबवडे : बौध्द विकास मंडळ (परखंदळे ) मुंबई ,या मंडळाचा  हिरक महोत्सवी जयंती सोहळा आज दि.१८ व १९ मे रोजी संपन्न होत आहे. तथागत गौतम बुद्ध, क्रांतीवीर महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव “  बुद्ध विहार ” संपन्न होत आहे. आज दि. १८ मे रोजी महामानवांच्या प्रतिमांची मिरवणूक वाजत गाजत संपन्न होत आहे.

बौध्द विकास मंडळ परखंदळे या मंडळाचे हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. हे मंडळ खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका,संघटीत व्हा, आणि संघर्ष करा, या प्रबोधनाचे धीरोदात्त उदाहरण आहे. येथील ९९ % समाज सुशिक्षित असून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी- व्यवसाय करीत आहे. दारिद्र्याच्या जोखडातून बाहेर पडलेली हि मंडळी आपल्या समाजाला वेगवेगळ्या स्तरावर मदत करीत असतात. गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी हि मंडळी गेली १५ वर्षे प्रयत्नशील आहेत. पण या हिरक महोत्सवी वर्षात गावात १ कोटी २७ लाख रुपये खर्चाची पेयजल पाणी योजना गावात आणण्यात ग्रामस्थांसाहित हि मंडळी यशस्वी झाली आहेत. गावातील १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य हे मंडळ प्रतिवर्षी पुरवत आले आहे. एकंदरीत मंडळ नेहमीच औदार्य दाखवीत अनेक मंडळींना मदतीचा हात देत आले आहे.

दि.१९ मे रोजी सभाध्यक्ष स्थानी मंडळाचे सुदाम कांबळे  प्रमुख कार्यवाह बौ.वी.मं. हे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विनयजी कोरे, कर्णसिंह गायकवाड, प्रा. अश्विनी तोरणे (डॉ.टी.के. टोपे महाविद्यालय मुंबई ) आदी मान्यवर असणार आहेत. विशेष उपस्थिती सर्जेराव पाटील (जि.प.सदस्य संचालक के.डी.सी.बँक ),सुरेश गायकवाड (अध्यक्ष शा.ता.बौ.से.सं.), बाबा लाड (अध्यक्ष बाजार समिती कोल्हापूर ),महादेवराव पाटील, विष्णू पाटील, भालचंद्र देशमुख सहा. पो.नी. सदाशिव सुतार पोलीस पाटील, आदी मान्यवर असणार आहेत.

कार्यक्रमाचे संयोजक  कार्याध्यक्ष आयु.डॉ. बापूसाहेब कांबळे, आयु. गामाजी गो. कांबळे,उपाध्यक्ष आयु.शिवाजीराव कोल्हापुरे, आयु. डॉ.सुधीर आ.कांबळे, सचिव आयु. बापू ब. कांबळे, सहसचिव आयु. भीमराव बं. कांबळे,खजिनदार आयु. गौतम शं. कांबळे, हि.तपासनीस आयु. मिलिंद ज्ञा. कांबळे,सल्लागार आयु. गुंगा गो. कांबळे, आयु.सुहास शि. कोल्हापुरे (सदस्य ग्रा.पं.परखंदळे ) आदी मान्यवर असणार आहेत.

मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षाबद्दल अध्यक्ष गिरीश कांबळे (दादा ) यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना हि माहिती दिली.

2+
2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: