सोंडोली च्या सरपंच पदी सौ.मंगल संपत पाटील बिनविरोध

बांबवडे : सोंडोली तालुका शाहूवाडी या गावच्या सरपंच पदी सौ. मंगल संपत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड सभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच अश्विनी पाटील उपस्थित होत्या.

सभेच्या सुरुवातीला स्वागत भेडसगावचे मंडल अधिकारी एम.एम. जाधव यांनी केले. मावळत्या सरपंच अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्याने येथील सरपंच पद रिक्त झाले होते. या पदासाठी सौ. मंगल पाटील यांचा एकमेव अर्ज सरपंच पदासाठी आल्याने अध्यासी अधिकारी एम.एम.जाधव  यांनी सरपंच पदासाठी सौ. मंगल संपत पाटील यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.

या निवडीनंतर नूतन सरपंच सौ.मंगल पाटील यांचा अनेक मान्यवरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

सध्या सोंडोली ग्रामपंचायत वर आमदार सत्यजित पाटील यांची सत्ता आहे. ९ पैकी ८ सदस्य आमदार पाटील गटाचे आहेत. यावेळी विश्वास साखर कारखान्याचे संचालक यशवंत दळवी, माजी सरपंच भीमराव पाटील, उपसरपंच गोरख पाटील, तुकाराम पाटील, संपत पाटील, सेवा संस्थेचे चेअरमन रामचंद्र पाटील, ग्रा.पं. सदस्य प्रकाश मोळे, शारदा पाटील, सुनिता पाटील, शीतल चोपडे, जिजाबाई कदम, डॉ.सदाशिव पाटील, आकाराम घराळ, ग्रामसेवक बी.जी. पाटील, गावकामगार तलाठी शिंदे यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते. आभार संपत पाटील यांनी मानले.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: