डोणोली सरपंच शेळके यांना लाच स्वीकारताना अटक

बांबवडे : डोणोली तालुका शाहूवाडी जि. कोल्हापूर चे सरपंच पंडित बापू शेळके ( वय ६५ वर्षे ) यांनी ग्रामपंचायत चे ना हरकत प्रमाणपत्र देणेसंदर्भात तक्रारदार यांचेकडून ४०००/- रुपये रकमेची लाच स्वीकारताना साक्षीदार व पंच यांच्यासमोर लाच लुचपत प्रतिबंधक अधिकारी व कर्मचारी यांनी रंगेहाथ पकडले आहे. याबाबत शाहूवाडी पोलीस ठाणे इथं गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांना डोणोली गावाच्या हद्दीत नारळाचे होलसेल व किरकोळ असे दुकान सुरु करावयाचे होते. यासंदर्भात त्यांनी ग्रामपंचायत डोणोली यांचेकडे दुकान चालविणे संदर्भात ना हरकत प्रमाणपत्र मागितले. यासाठी सरपंच पंडित शेळके यांनी ५०००/- रु. ची मागणी केली. त्यावेळी त्यांनी ती रक्कम ४०००/-रु. निश्चित केली. याबाबत तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान सरपंच यांनी तक्रारदारास प्रमाणपत्र देणेसाठी अंबीरा पूल येथील शाहू चिकन सेंटर जवळ यायला सांगितले. याची माहिती तक्रारदार याने विभागाला दिली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. सरपंच पंडित शेळके तिथे आले असता ४०००/-रु. घेताना विभागाने पंच, साक्षीदार यांच्यासमोर,त्यांना रंगेहाथ पकडले.

सदरची कारवाई श्री संदीप दिवाण पोलीस उपायुक्त/ पोलीस अधीक्षक, व श्रीमती सुषमा चव्हाण अप्पर पोलीस उपायुक्त/ अप्पर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो पुणे, व श्री गिरीश गोडे पोलीस उपाधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार श्री मारुती पाटील पोलीस निरीक्षक, शाम बुचडे सहा.फौ.,पोलीस नाईक शरद पोरे,व पोलीस कॉ.रुपेश माने, हे. कॉ.गुरव, अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केली.

10+
10+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: