“ सांगा, आम्ही शिकायचं कसं ? ”: विद्यार्थी वि.मं.करंजोशी

शाहूवाडी : तालुक्यातील प्राथमिक विद्यामंदिर करंजोशी इमारतीची अवस्था दयनीय झाली असून, जिल्हा परिषद प्रशासन याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न जनतेतून उपस्थित करण्यात येत आहे.

या विद्यामंदिरातील छताचे रुपकाम मोडकळीस आले असून, ते कधी पडेल ,हे सांगता येत नाही. अशा अवस्थेत विद्यार्थ्यांनी बसायचे कसे ? किंवा यातूनच विद्यार्थी बसले, आणि दुर्घटना घडली, तर याला जबाबदार कोण ?हा प्रश्न हि इथं  महत्वाचा होवू लागला आहे.

एकीकडे खाजगी शाळा विद्यार्थी पळवू लागल्या आहेत. आणि जिल्हा परिषदेच्या शाळेची हि अवस्था, हा विरोधाभास निश्चितच विचार करण्यासारखा आहे. एकीकडे सर्व सोयींनी युक्त शाळा, दुसरीकडे छताला वाळवी लागलेली शाळा. याकडे शिक्षणविभाग कधी लक्ष देणार? हा प्रश्न विचाराधीन आहे.

या शाळेसाठी ग्रामपंचायतीने शेष फंडातून काही रक्कम खर्ची घातली आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांनी लोकसहभागातून देखील खर्च केला आहे. परंतु सध्याचा खर्च मोठा असल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थ हतबल झाले आहेत. अशावेळी जिल्हापरिषद ने निधी पुरवून ह्या विद्यामंदिराची अवकळा दूर केली पाहिजे.

अन्यथा विद्यार्थ्याचा असा प्रश्न निर्माण होईल कि, “ सांगा, आम्ही शिकायचं कसं ? ”

4+
4+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: