मागं घासून झालं, आत्ता ठासून करू या- आमदार सत्यजित पाटील

बांबवडे :जोतीबा ग्रामपंचायत च्या गुलाला च्या माध्यमातून दख्खन च्या राजाने गुलाला ला सुरुवात केली आहे. देशाचा प्रश्न ऐरणीवर असताना, आपली भूमिका शेवट पर्यंत गुलदस्त्यात ठेवून, उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी औलाद आमची नाही, आम्ही सामान्य जनतेवर मनापासून प्रेम करतो. म्हणून आम्ही प्रेमाच्या बाबतीत श्रीमंत आहोत, पण तुमच्याकडे वारेमाप पैसा उधळण्याची जरी क्षमता असली, तरी जनतेच्या प्रेमाबाबत मात्र हि मंडळी दरिद्री आहेत. म्हणूनच आपल्या सर्वांच्या प्रेमाच्या जीवावरच सांगतोय कि, इथून मागे घासून झालं, आत्ता मात्र ठासून करूया ,असे भावनिक आवाहन आमदार सत्यजित पाटील यांनी केले.

शित्तूर तर्फ मलकापूर तालुका शाहूवाडी इथं सुमारे २० कोटी रुपयांच्या विकास कामांची उद्घाटने पिशवी जिल्हा परिषद मतदारसंघात संपन्न झाली. यावेळी आमदार सत्यजित पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी माजी आमदार विनय कोरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर होते.

यावेळी बोलताना आमदार सत्यजित पाटील पुढे म्हणाले कि, मागील साडेचार वर्षात जेवढी विकासकामे झालीत, त्याच्या पाच टक्के कामेसुद्धा विरोधकांच्या काळात झाली नाहीत. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत, तुम्ही माझ्या प्रेमाच्या हाकेला जो प्रतिसाद दिलात, त्यामुळेच धैर्यशील माने यांचा विजय झाला, याबद्दल आपले निश्चितच आभार. आपल्या प्रेमाच्या जीवावरच आम्ही आमदार झालोय, इतर मंडळींसारखे मंत्र्यांचे तळवे चाटणार्यापैकी आम्ही नाहीत. केवळ एका पन्नास हजाराच्या बोअरच्या उद्घाटनासाठी अनेक माताभगिनी औक्षण करायला येतात,यापेक्षा वेगळ प्रेम काय हवे?,याबाबत विरोधक मात्र दरिद्री आहेत. असेही आमदार सत्यजित यांनी नाव न घेता संबंधितांना सांगितले. विकास कामांच्या माध्यमातून आपली गाडी वेगात पुढे निघाली आहे. अनेक पक्षातून शिवसेनेत कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. आमचा कार्यकर्ता सत्ता असो वा नसो जागचा हलत नाही. इथं इर्षा टोकाची होते, पण बदला-बदली ची भानगड कधी होत नाही. एवढा कार्यकर्त्याचा नेत्यांवर विश्वास आहे. गायकवाड साहेब, संजयदादा, आमचे वडील तुमच्या सर्वाचे बाबासाहेब दादा, या बुजुर्ग मंडळींनी कार्यकर्त्यांची मुळे घट्ट रुजवली आहेत. ती कधी बदलत नाहीत. म्हणूनच या मतदारसंघात विकासकामांच्या बाबतीत झुकते माप दिले आहे. तालुक्यातील कोणतीही वाडी-वस्ती रस्त्याशिवाय राहणार नाही ,हा माझा शब्द आहे. सर्व प्रथम वाडी वस्तीला विकासकामांच्या बाबतीत आपण प्राधान्य देत आलो आहोत. बाजागेवाडी, सावे, म्हांडलाईवाडी, पिंपळेवाडी, वरेवाडी, कुंभारवाडी आदी प्रत्येक वाड्यांवर काही ना काही विकासकाम दिले आहे. यावेळी तिथे आपले मतदान किती आहे, याचा विचार केला नाही. भविष्यात कोणतीही वाडी वस्ती डांबरीकरण शिवाय राहणार नाही, हा माझा संकल्प आहे. याचबरोबर पन्हाळा तालुक्याला देखील न्याय देण्याचा आपण यशस्वी प्रयत्न केला आहे. एकट्या कोडोली त चार ते पाच कोटींची कामे दिली आहेत. त्यामुळे त्या भागाला हि कळले आहे कि, आमदार कसा असावा. पन्हाळा तालुक्यतील मतदारांच्या हृदयात आपण स्थान निर्माण केले आहे.

आजच्या या  मेळाव्याला पुरुषांपेक्षा महिलांची अधिक उपस्थिती आहे. या माता-भगिनींच्या जीवावर आम्ही आमदार झालो आहोत,हे आम्ही विसरणार नाही. त्यांचा आदर करणे,आमचे कर्तव्य आहे.

यावेळी भावनिक होताना आमदार म्हणाले कि, भविष्यात माझ्या पश्चात तुमच्यापैकीच कुणीतरी आमदार होईल. शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा गुणवत्तेच्या बळावर हि मोठी पदे मिळवीत,असे आम्हाला वाटते.

 यावेळी खोतवाडी चे ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव खोत, शिवाजी खोत ,पेढेवाडीचे पांडुरंग लव्हटे, नाना लव्हटे यांनी जनसुराज्य पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या खांद्यावर सेनेचा भगवा देवून त्यांचे स्वागत आमदार सत्यजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना बाबासाहेब पाटील दादा म्हणाले कि, तात्या कोरे सहकारमहर्षी होते. पण हा माणूस त्यांचं नाव मातीत मिसळणार आहे. केवळ पैशाच्या जीवावर राजकारण करता येत नाही, तर ते विकासकामांच्या जीवावर करायचे असते. पैशावर राजकारण करणाऱ्या माणसाला विकासकामांच्या माध्यमातून उत्तर द्या, आणि तालुका खऱ्या अर्थाने स्वाभिमानी ठेवण्यासाठी सत्यजित यांच्या पाठीशी ठाम उभे रहा, असे आवाहन देखील माजी  आमदार बाबासाहेब पाटील दादा यांनी केले.

यावेळी रणवीर सिंग गायकवाड म्हणाले कि,  महाराष्ट्रात सर्वाधिक निधी आणणारे आमदार म्हणून सत्यजित आबा यांचे नाव घेतल्यास वावगे ठरणार नाही. आम्ही पराभूत झालो म्हणून घरात बसणार नाही, कारण आमच्याकडे गायकवाड साहेब,संजयदादा, बाबासाहेब दादा यांच्या विचारांची शिदोरी आहे. एकेकाळी गायकवाड साहेबांनी लाल दिवा तालुक्यात आणला होता, आता पुन्हा एकदा सत्यजित आबांना केवळ आमदार नव्हे तर , मंत्री म्हणून निवडून आणूया, आणि पुन्हा एकदा मंत्र्यांचा लाल दिवा तालुक्यात मिरवू या. येणाऱ्या पुढील सर्वच निवडणुकीत गुलाल आपलाच आहे, जनसुराज्य ला तालुक्यात खिंडार पडले आहे,असेही रणवीर सिंग गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गिरी म्हणाले कि, आमदार सत्यजित आबांनी तालुक्यातील पिशवी मतदारसंघात सुमारे २० कोटींची विकासकामे आणली आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आमदारांना भरघोस मतांनी निवडून आणू या.

यावेळी नामदेवराव पाटील सावेकर, महादेव ज्ञानदेव पाटील, नगरसेवक प्रवीण प्रभावळकर, आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, विजयराव बोरगे , पंचायत समिती सभापती अश्विनी पाटील, माजी सभापती सौ. स्नेहा जाधव, सुनिता पारले, विजय खोत, माजी उपसभापती दिलीप पाटील, उद्योजक धनंजय पाटील, उद्योजक तानाजी चौगुले, जालिंदर पाटील रेठरेकर, जयसिंगराव पाटील भाडळेकर, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रवीण प्रभावळकर, पळसे आण्णा, टी.डी. पाटील सर सावे, प्रकाश पाटील सावेकर, संजय पाटील गजापूर, शिवसेनेचे दत्ता पोवार, योगेश कुलकर्णी, यशवंत पाटील संपर्कप्रमुख, तुषार पाटील बांबवडे, विजय लाटकर, सचिन मुडशिंगकर, शित्तूर च्या सरपंच शालाबाई पाटील, सुहास पाटील मलकापूर, रामभाऊ कोकाटे,रंगराव किटे, सुरेश पारले, गामाजी ठमके, विठ्ठल पोवार, सुवर्णा दाभोळकर महिला आघाडी प्रमुख, अलका भालेकर, व पंचक्रोशीतील तमाम ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली होती.

3+
3+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: