आगामी विधानसभा निवडणुकीत सत्यजित पाटीलांचे पारडे जड ?

बांबवडे : एकीकडे राज्यात आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याची दिसत आहे. यामध्ये शाहूवाडी तालुक्याचे शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांनी विधानसभेचे बिगुल फुंकले असून, मतदारसंघाला शिवसेनेच्या पाठीशी ठाम रहाण्याचे भावनिक आवाहनही केले आहे. या दरम्यान प्रमुख विरोधी माजी मंत्री विनय कोरे, व कॉंग्रेस चे कर्णसिंह गायकवाड यांच्याकडून मात्र कोणत्याही तयारीची चिन्हे दिसत नाहीत.

कॉंग्रेस पक्षाने माजी खासदार राजू शेट्टींच्या समर्थनार्थ घेतलेल्या मेळाव्यानंतर,कॉंग्रेस कधीही एकत्र आल्याचे दिसून आले नाही. या अगोदरही कॉंग्रेस पक्ष निवडणुकीस उत्सुक असल्याचे दिसत नव्हते. परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कॉंग्रेस एकदाच दिसली, त्यानंतर मात्र पुन्हा कुठे गेली ? हा संशोधनाचा विषय आहे. नेमके या निवडणुकीत कॉंग्रेस लढणार तरी आहे का? हा प्रश्न सुद्धा जनतेला सतावत आहे. त्याचबरोबर कॉंग्रेस पक्षाला, किंबहुना संजयदादा यांना मानणारी सामान्य जनता बुचकळ्यात आहे. पक्षाचे पुढारी मात्र वावरत जरी असले,तरी त्यांनी निवडणूकबाबत कोणतीही चर्चा केल्याचे दिसून येत नाही.

दरम्यान आमदार सत्यजित पाटील यांनी विकासकामांचा धडाका सुरु केला असून, सामान्य जनतेला त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण होताना दिसत आहे. वाड्या वस्त्या वरील रस्ते ,आणि तेथील जनतेचे प्रश्न सोडविण्याचे त्यांचे यशस्वी प्रयत्न सुरु आहेत. या तुलनेत कॉंग्रेस मात्र खूप पिछाडीवर असल्याचे जाणवते. मुळात कॉंग्रेस कडे संजय दादा यांच्यासारख्या अवलियाची शिदोरी असताना,हि मंडळी भविष्याकडे पाहून सावध पावले उचलत आहेत का?, दरम्यान कौटुंबिक कलहात हि मंडळी असल्याची चर्चा जनतेतून ऐकावयास मिळत आहे.

परंतु संजयदादा या नावावर प्रेम करणारी जनता आजही दादांच्या नावासाठी गप्प आहे. परंतु या जनतेने आणखी किती वेळ आपल्या प्रतीक्षेत राहावी, असा सामान्य प्रश्न या लोकांना पडला आहे. तसेच पक्षाने कोणतीही रणनीती आखल्याचे दिसत नाही, तर एवढ्या कालावधीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाल्याचेही ऐकिवात नाही.

दरम्यान सध्याच्या घडीला शिवसेनेचा वारू मात्र वेगाने घोडदौड करीत असल्याचे दिसत आहे. याच जोडीला नूतन खासदार धैयर्शील माने यांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनता शिवसेनेकडे झुकत असल्याचे सध्याचे चित्र आहे. याचबरोबर उदय साखर चे संचालक रणवीरसिंग गायकवाड हेदेखील तयार झाले असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून भासत आहे. त्यांच्या भावनिक आवाहनाला तरुणाई निश्चित प्रतिसाद देईल, आणि ती आमदार सत्यजित पाटील यांची खूप मोठी जमेची बाजू ठरणार आहे.

जनसुराज्य चे माजी मंत्री विनय कोरे यांनी अद्याप कोणतेही पाउल उचलल्याचे दिसत नाही. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत गप्प राहण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय जनतेला कितपत रुचला हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे.

एकंदरीत हि आगामी विधानसभा निवडणूक एकतर्फी होतेय का ? असा प्रश्न पडत असताना दुसरीकडे मात्र सत्यजित पाटील यांचं पारडं जड होतेय. अशीच चर्चा सर्वसामान्य जनतेतून ऐकावयास मिळत आहे.

11+
11+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: