उद्या ५ जून रोजी अँँब्युलंस लोकार्पण सोहळा : नरेंद्राचार्यजी महाराज नाणीज धाम

बांबवडे :बांबवडे तालुका शाहूवाडी इथं बांबवडे दूरक्षेत्र पोलीस ठाणे समोर
अँँब्युलंस लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे सामाजिक कार्य जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज नाणीज धाम, ता.जि. रत्नागिरी यांच्या वैद्यकीय उपक्रम अंतर्गत करण्यात येत आहे. सदर अॅम्ब्युलंस लोकार्पण सोहळा बुधवार दि. ५ जून २०१९ रोजी ठीक ४.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या वैद्यकीय उपक्रम अंतर्गत हायवे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी विनामुल्य अॅम्ब्युलंस सेवा देण्यात येणार आहे. सदर लोकार्पण सोहळ्यास ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवावी,असे आवाहन जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ  कोल्हापूर जिल्हा यांनी केले आहे.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: