नरेंद्राचार्य महाराज नाणीज धाम च्या मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न

बांबवडे : नरेंद्राचार्यजी महाराज नाणीज धाम संस्थानच्या वैद्यकीय उपक्रमांतर्गत बांबवडे तालुका शाहूवाडी इथं मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

प्रारंभी गावचे सरपंच,उपसरपंच व मान्यवरांच्या वतीने दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी संस्थानचे श्री गोडेकर यांनी या वैद्यकीय उपक्रमाची माहिती देताना सांगितले कि, संस्थानाच्या वतीने विविध राज्यमार्गावर एकूण २६ मोफत  रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यांच्यामुळे सुमरे१२ हजार अपघातग्रस्त रुग्णांचे प्राण वाचविले गेले आहेत. या रुग्णवाहिका केवळ हायवे वर होणाऱ्या अपघातग्रस्तांसाठी च वापरण्यात येणार आहेत. साखरपा ते कोल्हापूर दरम्यान रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, त्यामुळे  हि रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे.

या रुग्णवाहिकेची चावी सरपंच सागर कांबळे यांच्या हस्ते बांबवडे दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे हवालदार दिनकर अपराध ,श्री पवार यांच्याकडे सोपविण्यात आली. यावेळी सरपंच, मुकुंद पवार, सुभाष सुतार,जिल्हाध्यक्ष लोकरे  आदींनी मनोगते व्यक्त केलीत.

या लोकार्पण सोहळ्यावेळी उपसरपंच सयाजी निकम,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, माजी सरपंच विष्णू यादव, सदस्य सुरेश नारकर, अभयसिंह चौगुले,

सचिन मुडशिंगकर, रामचंद्र शेळके, विमल कुंभार आदी मान्यवरांसह अनुयायी उपस्थित होते.

या रुग्णवाहिकेचे चालक राहुल कुंभार असून, अपघातग्रस्तांसाठी ८८८८२६३०३० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. हि सेवा २४ तास सुरु असणार आहे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

2+
2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: