पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील

सोंडोली(संपत पाटील) :

जुलै २०१९ पावसाळी अधिवेशनामध्ये पहील्याच दिवशी अर्थसंकल्पातून शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील मुख्य रस्ते व पुलांच्या कामासाठी १० कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती  आमदार सत्‍यजित पाटील (आबा) सरुडकर यांनी दिली.

यामध्ये पोर्ले ते उत्रे रस्ता सुधारणा करणे ता.पन्हाळा – २५ लाख, पन्हाळा ते वाघबीळ रस्ता सुधारणा करणे  ४० लाख, पोर्ले – माजगांव पुलाचे रुंदीकरण करणे  २ कोटी, राज्य मार्ग  १९२ पोखले फाटा ते कोडोली सर्वोदय चौक रस्ता सुधारणा करणे २८ लाख,शाहूवाडी तालुक्यातील राघुचावाडा ते उदगिरी रस्ता मजबुतीकरणासह सुधारणा करणे – १ कोटी १२ लाख, हाडकेचा माळ ते उदगिरी रस्ता मजबुतीकरणासह सुधारणा करणे ५ कोटी २० लाख, मालेवाडी ते सोंडोली रस्ता सुधारणा करणे ९८ लाख आदी विकासकामांचा समावेश आहे.

4+
4+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: