शासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई

सोंडोली ( संपत पाटील ):

शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ सामान्य माणसा पर्यंत पोहोचण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

ते फोर्ट इंटरनॅशनल स्कूल वाघबीळ, तालुका पन्हाळा, इथं आयोजित विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जलसंधारण व पाण्याचे नियोजन, किसान सन्मान निधी योजना, किसान क्रेडीट कार्ड योजना, ३३ कोटी वृक्ष लागवड, जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण व लोकप्रतिनिधींचा सहभाग, ७/१२ संगणकीकरण या योजनांची सविस्तर माहिती व करावयाची कार्यवाही याविषयी मार्गदर्शन केले.

या बैठकीस उपजिल्हाधिकारी कुलकर्णी मॅडम, उपविभागीय अधिकारी शाहूवाडी-पन्हाळा, तहसिलदार पन्हाळा, दोन्ही तालुक्यातील मंडल अधिकारी, गटविकास अधिकारी अनिलकुमार वाघमारे, सरपंच, ग्रामसेवक, गावकामगार तलाठी, कृषी अधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी आभार शाहूवाडी चे तहसिलदार चंद्रशेखर सानप यांनी मानले. 

2+
2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: