बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सहा नर्स क्वार्टर्स मंजूर

बांबवडे : बांबवडे तालुका शाहूवाडी इथं प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सहा नर्स क्वार्टर्स मंजूर करण्यात आल्याची माहिती येथील जिल्हापरिषद सदस्य पैलवान विजयराव बोरगे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले कि, बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या ठिकाणी आहे. इथं येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. इथं एक वैद्यकीय अधिकारी, शिपाई तसेच अनेक पदे रिक्त आहेत.पैकी दोन शिपाई य रिक्त ठिकाणी मंजूर झाले आहेत. वैद्यकीय अधिकारी पदासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान सहा परिचारक निवास एन.आर.एच.एम. निधीमधून सुमारे सहा लाख रुपये मंजूर झाले असून, लवकरच कामास सुरुवात होईल.

दरम्यान गेले चार दिवस सुरु असलेल्या पावसामुळे येथील संरक्षित भिंतीचा काही भाग तुटला आहे. लवकरच याची दुरुस्ती होईल, असेही जिल्हा परिषद सदस्य बोरगे यांनी सांगितले.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: