शहीद जवान श्रावण माने यांचा द्वितीय पुण्यस्मरण संपन्न

बांबवडे : शहीद जवान श्रावण बाळकू माने यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

भारतीय सरहद्दीवर आपले कर्तव्य बजावत असताना पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये गोगवे तालुका शाहूवाडी येथील जवान श्रावण बाळकू माने हे शहीद झाले. या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली असून, त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबीर, शालेय क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी वीर पिता बाळकू माने, वीर माता शोभा माने,भाऊ जवान सागर माने व त्यांची पत्नी,तसेच अनेक नातेवाईक,ग्रामस्थ यांनी शहीद जवान श्रावण माने यांना श्रद्धांजली वाहिली.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: