कानसा-वारणा फौंडेशन चा स्तुत्य उपक्रम

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील उत्तर भागातील जांबूर  विद्यामंदिरात कानसा-वारणा फौंडेशन च्यावतीने विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच केंद्रीय प्राथमिक शाळा शित्तूर तर्फ वारुण येथील शालेय विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी फौंडेशन चे संस्थापक दीपक पाटील तसेच विरळे गावाचे सरपंच कृष्णा पाटील हे देखील उपस्थित होते.

एकदम दुर्गम असलेल्या परिसरात हे दोन्ही बंधू कानसा-वारणा फौंडेशन च्या माध्यमातून आपली सामाजिक बांधिलकी पार पाडत आहेत. अशा संस्थांची सध्या समाजाला गरज भासत आहे. स्वत: चा वेळ आणि पैसा खर्च करून हि मंडळी समाज भावना जपत असल्याने त्यांचे परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने कौतुक केले जात आहे.

यावेळी डॉ. संजय मगदूम  शित्तूर येथील सरपंच आनंदा पाटील, उद्योजक महेंद्र पाटील, अनिल पाटील, केशव डिगे,बाजीराव पाटील, केशव पाटील, बाबुराव पाटील, मुख्याध्यापक जाम्बुर, शिक्षक वृंद, तसेच शित्तूर-वारुण येथील  मुख्याध्यापक,शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: