सोंडोली ते जांबूर रस्त्याची दुरावस्था : नागरिकांचे हाल

सोंडोली प्रतिनिधी : सोंडोली तालुका शाहूवाडी इथं सोंडोली ते जांबूर दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देवून त्वरित काम करून घेणे गरजेचे आहे.अन्यथा अपघात होवून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.

सोंडोली,थावडे ते जांबूर मार्गे मालगाव-कांडवण ला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. कांडवण इथं असलेल्या धरणामध्ये बोटिंग असल्याने पर्यटकांची संख्या अधिक आहे. या परिसरातील लोकांसाठी चरण येथे मोठी बाजारपेठ असल्याने वाहनांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. इथं रस्त्यात खड्डे कि,खड्ड्यात रस्ते हे समजणे कठीण झाले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांना चालत जाणे,हि सुद्धा कसरत झाली आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एसटी खात्याने एसटी बसेस बंद केल्या आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून रस्त्याची दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

2+
2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: