पिशवी मतदासंघात ७६ कोटींची विकासकामे : जि.प.सदस्य विजयराव बोरगे

बांबवडे : पिशवी जिल्हापरिषद मतदारसंघात ७६ कोटींची विकासकामे मानसिंगदादा गायकवाड व आमदार सत्यजित पाटील आबा यांच्या सहकार्यातून पूर्ण झाली असून, अनेक कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती येथील जिल्हा परिषद सदस्य विजयराव बोरगे (पैलवान ) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पिशवी मतदारसंघात जिल्हापरिषद निधी, आमदार सत्यजित पाटील व मानसिंग दादा यांच्या सहकार्यातून अनेक कामे पूर्णत्वास गेली आहेत. हि कामे जनसुविधा, नळ पाणीपुरवठा,शिक्षण विभाग, महिला बालकल्याण, आरोग्य, कृषी,बांधकाम अशा विवध कामांमधून ह्या निधीचे वाटप करण्यात आले असून, बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत.

सामान्य जनतेचे मुलभूत प्रश्न सोडवणे, हाच माझा अजेंडा होता, त्या अनुषंगाने गरजेनुसार क्रमवारी देवून हि कामे पूर्ण झाली आहेत. तरी अनेक कामे आजही अपूर्ण आहेत. निधी अभावी त्याला प्राधान्य देता आलेले नाही. परंतु माझ्या कारकिर्दीत हि कामे निश्चितच पूर्ण केली जातील, अशी ग्वाही देखील यावेळी श्री बोरगे यांनी दिली.

यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेला नळ पाणीपुरवठा योजनांपैकी अनेक योजना अपूर्ण आहेत, याला उत्तर देताना बोरगे म्हणाले कि, या योजनांच्या समितीने याबाबत तक्रार केल्यास मी त्याबाबत लक्ष घालून या योजना निश्चित पूर्ण करून देण्यास प्रयत्न करेन.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमन मित्तल यांनी पिशवी मतदारसंघात शैक्षणिक आणि आरोग्य बाबत प्राधान्याने मदत केली आहे. यामध्ये साळशी जीवनशिक्षण विद्यामंदिर ला १६ लॅपटॉप, शाळा कंपाऊंड, बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १० हजार लिटर पाण्याची टाकी, कर्मचारी, अशा अनेक सुविधा स्वत: लक्ष घालून पूर्ण करून दिल्या आहेत. भविष्यात इथं २ कोटींचे सुसज्ज आरोग्य केंद्र निर्माण केले जाईल, अशी ग्वाहीदेखील श्री विजय बोरगे यांनी दिली.

तसेच कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती शासकीय दप्तरात अडकल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे, भविष्यात आमचा याबाबत पाठपुरवठा असून, लवकरच येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद देखील भरण्यात येईल. अशी माहिती देखील जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी पत्रकारांना दिली.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: