पिंपळेवाडीत चार दिवस विद्युत पुरवठा खंडित :नागरिकांचे हाल

बांबवडे : परखंदळे पैकी पिंपळेवाडी तालुका शाहूवाडी इथं पावसाने विद्युत खांब पडल्याने या परिसरात सुमारे चार दिवस विद्युत पुरवठा बंद आहे. याबाबत स्थानिक विद्युत विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले असून,अधिकारी वर्ग उडवा उडवीची उत्तरे देत असल्याची माहिती येथील उपसरपंच रमेश पिंपळे यांनी दिली.

येथील खंडित वीज पुरवठ्यामुळे जनतेचे हाल झाले असूनही, विद्युत विभागाची मंडळी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या खंडित वीज पुरवठ्यामुळे मोबाईल चार्जिंग नसल्याने संपर्क तुटला आहे. तसेच पाणी पुरवठा बंद झाला आहे. तसेच पिठाची गिरण बंद पडल्याने जनतेचे हाल झाले आहेत. दरम्यान येथील विद्युत खांब वरचेवर पुरल्याने हि अवस्था झाली आहे. यामध्ये कंत्राटदारांनी काम व्यवस्थित न करता बिले उचलली आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष घालून विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: