महादेव फौंडेशन व ग्रामपंचायत साळशी यांच्या वतीने “ शिवचरित्र ”व्याख्यान

बांबवडे : साळशी तालुका शाहूवाडी इथं दि.१२ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता महादेव फौंडेशन व ग्रामपंचायत साळशी यांच्या संयुक्त विद्यमाने  “ शिवचरित्र ” व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. डॉ. शिवरत्न शेटे यांना पाचारण करण्यात आले आहे.

यासाठी अचलपूर अमरावती चे आमदार बच्चू कडू, चंद्रकांत गुड्डेवार उपायुक्त पुणे, कोल्हापूर मनपा चे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, पानिपतकार विश्वास पाटील, ओमप्रकाश शेटे मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षप्रमुख ,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेंव्हा या व्याख्यानाचे ज्ञान घेण्यासाठी पंचक्रोशीतील तमाम नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. हे व्याख्यान साळशी येथील मारुती मंदिर इथं संपन्न होणार आहे.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: