“ गोकुळ ” ला बदनाम करण्याचा खटाटोप राजकीय द्वेषापोटी : संचालक देसाई

कोल्हापूर : “ गोकुळ ” दुध संघ हा सहकारातील मानदंड असून, कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता आहे. अशा दुध संघाला कोणीतरी वयैक्तिक स्वार्थापोटी बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा स्वार्थी आणि ढोंगी लोकांपासून सभासद व जनतेने दूर राहावे, असे आवाहन गोकुळ चे संचालक धैर्यशील बजरंग देसाई यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या प्रसिद्धी पत्रकात ते पुढे म्हणाले कि, काही मंडळी ह्या दुध संघाच्या मल्टीस्टेट प्रस्तावाला विरोध करीत आहेत. परंतु मल्टीस्टेट नसल्यामुळे आपण आपल्या लगतच्या सांगली जिल्ह्यातील दुध संकलन करू शकत नाही.

एकीकडे साखर कारखानदारी अडचणीत येत आहे, पण गोकुळ चा दुध उत्पादक ३,१३,२३ तारखेला आपल्या दुधाचे बिल अखंडितपणे मिळवत आहे. या संघाने आजपर्यंत जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याची चूल चालवली आहे. पण काही मंडळी राजकीय द्वेषापोटी गोकुळ वर टिका करीत आहेत. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे,कि ह्याच गोकुळचा हात धरून आपण आपले राजकीय बस्तान बसवले होते. आत्ता गरज सरल्यामुळे टिकांचे उपद्व्याप सुरु आहेत. गोकुळ च्या मल्टीस्टेट बाबत कोणतीही माहिती न घेता वयैक्तिक स्वार्थापोटी व राजकीय द्वेषापोटी सामान्य जनतेची दिशाभूल करीत आहेत. स्व.आनंदराव चुयेकर, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच आमचे नेते महादेवराव महाडिक व पी.एन.पाटील यांच्या नेतृत्वामुळेच या संघाचे नाव देशभर पसरले आहे. जिल्ह्यातील बरेच दुध संघ,सहकारी बँका मल्टी स्टेट झाल्या आहेत. परंतु वयैक्तिक स्वार्थापोटी काही मंडळी यास विरोध करीत असून,या माध्यमातून सामान्य शेतकऱ्याच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम हि मंडळी करीत आहेत. तेंव्हा अशा लोकांपासून सभासद वर्ग,व सामान्य जनतेने दूर रहावे,असे  आवाहन हि संचालक धैर्यशील देसाई यांनी केले आहे.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: