पूरग्रस्त भागाला मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधी कटीबद्ध :आभार एसपीएस न्यूज

बांबवडे : पिशवी जिल्हा परिषद मतदार संघाचे जि.प.सदस्य श्री विजयराव बोरगे  यांनी स्वत:चे वर्षभराचे मानधन पूरग्रस्तांसाठी खारीचा वाटा म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. खरोखर अशा सर्वच लोकप्रतिनिधींचे अभिनंदन.

बोरगे साहेबांनी वयैक्तिक रित्या स्वत: अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. त्याचबरोबर या महापुरानंतर निर्माण होणाऱ्या रोगराई च्या परिस्थितीला पायबंद घालण्यासाठी आरोग्य विभागाशी ते सातत्याने संपर्क ठेवून आहेत. भविष्यात कोणालाही औषध पुरवठा कमी पडू नये, म्हणून सातत्याने ते धडपडत आहेत. त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा जय्यत तयारीत आहेत. भेडसगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.माळी यांनीसुद्धा जीवाची पर्वा न करता पूरग्रस्त ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवीत आहेत.

आपले आमदार सत्यजित पाटील यांनीसुद्धा अनेक ठिकाणी भेटी देवून आपल्या जनतेला आधार दिला आहे. त्याचबरोबर जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांनीसुद्धा पूरग्रस्त भागात भेटी देवून मदत केली आहे.  जि.प. स. हंबीरराव पाटील यांनी सुद्धा थेरगाव, सोंडोली सारख्या पूरग्रस्त भागात भेटी दिल्या, आणि लवकरच लोकांपर्यंत मदत सुद्धा पोहचवतील. त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य विजय खोत यांनीसुद्धा सातत्याने पूरग्रस्त लोकांसाठी कशी मदत पोहचेल,तसेच त्यांच्याविषयी ची माहिती प्रशासनापर्यंत पोहचवण्याचे काम उत्तमरीत्या केले आहे. उदय साखर चे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांनी सुद्धा विविध ठिकाणी भेटी देवून लोकांचे सांत्वन केले.

जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी सुद्धा पुराच्या पाण्यातून जावून आपल्या कानसा खोऱ्याला मदत करण्यासाठी भेटी दिल्या आहेत.

दरम्यान कॉंग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष सौ .वैशाली बोरगे यांनी सुद्धा या सामाजिक कामात खारीचा वाटा उचलला आहे. एकंदरीत कोणताही गट तट विचारात न घेता या लोकप्रतिनिधींनी समाजाला मदत करण्याचा वसा सक्षमपणे पेलला आहे.

या सर्वच लोकप्रतिनिधींचे साप्ताहिक शाहूवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने आभार आणि अभिनंदन..

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: