‘वाघवे’ त सेना-राष्ट्रवादी ला खिंडार : सरपंच सह, सहा सदस्य ‘जनसुराज्य’ मध्ये

वाघवे : वाघवे तालुका पन्हाळा येथील शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीच्या सहा सदस्यांनी ह्या युतीला ‘जय महाराष्ट्र’ करीत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, इथं शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची गेली तीन पंचवार्षिक ग्रामपंचायत वाघवे वर सत्ता होती. नुकत्याच झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सहा सदस्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सौ. जयश्री जयसिंग साठे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षात नूतन सरपंच सौ. जयश्री साठे, उपसरपंच मंगल सुर्वे, सदस्य संजय सुतार, संजय यादव, बाजीराव उदाळे, पूनम विभूते, संपदा माने यांनी प्रवेश केला आहे.

जनसुराज्य पक्षाचे संस्थापक व माजी मंत्री डॉ. विनयरावजी कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश झाला. यासाठी प्रदेशाध्यक्ष सुमित कदम, जिल्हा अध्यक्ष शंकरराव कांबळे व पन्हाळा-शाहूवाडी चे संघटक प्रमुख मारुती पाटील यांच्या सहकार्याने हि प्रक्रिया पार पडली. यावेळी पन्हाळा चे उपसभापती संजय माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2+
2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: