गणेश कला,क्रीडा,सांस्कृतिक मंडळ,गणेशनगर यांच्यावतीने पूरग्रस्तांसाठी योगदान

बांबवडे : बांबवडे तालुका शाहूवाडी येथील गणेश कला,क्रीडा,सांस्कृतिक मंडळ,गणेशनगर यांच्यावतीने पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून मटकी, मुग, गोडेतेल प्रत्येकी अर्धा किलो असे १०० पाकिटे तयार करून ग्रामपंचायत बांबवडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

तीन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत बांबवडे इथं बांबवडे गावातील सर्व गणेश मंडळांना बोलविण्यात आले होते. यावेळी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री भालचंद्र देशमुख या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत सर्वमताने सर्व गणेश मंडळांनी आपल्या इतर खर्चांना फाटा देवून पूरग्रस्त बांधवांसाठी प्रयेकी ११०००/- रु. देण्याचे मान्य करण्यात आले. त्याची सुरुवात म्हणून गणेश कला,क्रीडा,सांस्कृतिक मंडळ,गणेशनगर यांच्यावतीने सुमारे १२००० हजार रुपयांचे जीवनावश्यक सामुग्री आज दि.१२ ऑगस्ट २०१९ रोजी ग्रामपंचायत कार्यालय इथं देण्यात आली.

दरम्यान मदतीचा ओघ सुरु झाला आहे. सर्वच मंडळांनी लवकरात लवकर आपले योगदान पूरग्रस्त बांधवांसाठी द्यावे,असे आवाहन ग्रामपंचायत बांबवडे यांच्यावतीने करण्यात आले.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: