कोल्हापूरला आला “ भावनांचा ” पूर
बांबवडे : कोल्हापूर च्या आणि सांगली च्या पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी सैन्यातील जवान, एनडीआरएफ चे जवान, आणि हवाईदल त्याचबरोबर जे जे सैनिक आणि रेस्क्यू टीम आपले कर्तव्य बजावून आप-आपल्या ठिकाणी परत निघाले.
त्यांनी जाताना घेतले, इथले अनुभव आणि त्याचबरोबर, गोळा केला सांगली आणि कोल्हापुरकरांचा भावनांचा पूर. हा पूर त्यांना आयुष्यभर लक्षात राहील असाच होता. एक होता ‘ पाण्याचा ’ आणि दुसरा होता ‘ भावनांचा ’ .
हि रेस्क्यू टीम आणि त्यांचे जवान परत निघाले आणि, घेतला कोल्हापुरकरांचा निरोप. त्यावेळी अनेक माताभगीनिंनी तब्बल तीन दिवस अगोदर रक्षाबंधन हा आपुलकीच्या धाग्याचा सण जवानांना राखी बांधून साजरा केला. हाच खरा भाऊ रक्ताचा नसला तरी भावनांचा होता. कारण कोणी हाताला धरून,तर कोणी खांद्यावर घेवून माता भगिनींना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.
हा नात्यांचा जिव्हाळा अनुभवला जवानांनी.