“ शाहूवाडी च्या मातीला दातृत्वाचा गंध आहे, “साहेबांच्या” सेनेला नेहमीच समाजभान आहे. ”

बांबवडे : “ शाहूवाडी च्या मातीला दातृत्वाचा गंध आहे, “साहेबांच्या” सेनेला नेहमीच समाजभान आहे. ”

शाहूवाडी तालुक्यातील शिवसैनिकांनी आपल्या पूरग्रस्त बांधवांसाठी मोठी मदत गोळा केली असून, उद्या १४ ऑगस्ट २०१९ रोजी हे सर्व शिवसैनिक करंजफेण, इंजोली, सावर्डी, पाल, मरळी येथील पूरग्रस्त नागरिकांना हि मदत पोहोच करणार आहेत. या साठी आमदार सत्यजित पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांच्या नियोजनांतर्गत  शिवसेना शाहूवाडी –पन्हाळा विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी यांचे कडून पूरग्रस्त नागरिकांना हि  मदत देण्यात येणार आहे.

या मदतीमध्ये तांदूळ ५ किलो प्रती पाकीट असे ५०० पाकिटे, गहू ५ किलो प्रती पाकीट असे ५०० पाकिटे, आंघोळीचा साबण १२०० नग, गोडेतेल १ किलो प्रती पाकीट अशी ६०० पाकिटे , बिस्कीट पुडे १००० नग, टूथपेस्ट ६०० नग, नवीन कपडे महिलांसाठी साडी ४५० नग, सॅनेटरी नॅपकीन, पुरुष मंडळींसाठी उपयुक्त कपडे ५०० नग, लहान मुलांसाठी नवीन कपडे २०० नग, आदी वस्तू नागरिकांसाठी गोळा केल्या आहेत.

हि मदत गोगवे, गोगवे पैकी तळपवाडी, शित्तूर तर्फ मलकापूर, परळी, सोनुर्ले, बांबवडे, बांदिवडे, सरूड आदी गावातील ग्रामस्थांनी दिली आहे. त्याचबरोबर उद्योजक धनंजय पाटील, परेश सोळंकी, महेश पाटील, सुखदेव गिरी, नामदेव गिरी(उपजिल्हाप्रमुख ), दत्तात्रय पोवार (शाहूवाडी तालुका अध्यक्ष ),

बाबा पाटील ( डी.एम.ग्रुप ),या सर्व दात्यांनी यात सिंहाचा वाटा उचलला आहे. हि मदत गोळा करण्यासाठी तसेच त्याच्या पॅकिंग साठी शिवसैनिक हरीश पाटील, संदीप पाटील (युवा सेना अध्यक्ष ), सचिन मुडशिंगकर, विजय लाटकर, तुषार पाटील, प्रसाद गिरी, अनिल पाटील (शाहीर ), विजय कांबळे, हिम्मतराव मुळीक, अमोल डवंग, सुरेश घाडगे, वैभव चव्हाण, शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख सौ.सुवर्णा दाभोळकर, अलका भालेकर, जानकी कुंभार, पल्लवी बाऊचकर, पूनम भोसले, कल्याणी शिंत्रे, लक्ष्मी तडवळेकर, संगीता झेंडे, आदी महिला शिवसैनिकांनी सुद्धा दातृत्वाच्या कामात आपल्या कष्टाचे मोलाचे योगदान दिले.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: