लाईट ऑफ लाईफ ट्रस्टद्वारे विघवली येथे विद्यार्थ्यांचे चर्चात्मक मार्गदर्शन

       बोरघर / माणगांव  ( विश्वास   गायकवाड  ) : रायगड जिल्ह्यातील  माणगांव तालुक्यामध्ये लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही सामाजिक संस्था मागील १२ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात अविरत काम करीत आहे. विघवली हायस्कुल येथे १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता विद्यार्थ्यांची महाचर्चा याचे आयोजन करण्यात आले होते.

माणगांव तालुक्यातील नवजीवन विद्या मंदिर तळाशेत, नूतन माध्यमिक विद्यालय खरवली, विघवली हायस्कुल, लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिर साई या चार शाळांमध्ये येणाऱ्या ६० ते ७० गावातील अनाथ, एकेरी, पालकत्व, आदिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी अनेक उपक्रम राबवित असते. यापैकी दहावीच्या विध्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणि पूर्ण वर्षासाठी योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी ही महाचर्चा आयोजित करण्यात आली होती.

   या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी संस्थेतील मागील वर्षाच्या पहिल्या चार विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या चारही विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कसे संपादन केले. यश मिळविताना येणाऱ्या अडचणी, समस्या यावर कशी मात केली, हे सविस्तर त्यांनी उपस्थित विध्यार्थ्यांसमोर मांडले. त्याचबरोबर आपले ध्येय कसे असले पाहिजे, संपूर्ण वर्षाचे अभ्यासाचे नियोजन कसे असले पाहिजे, कठीण वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास कसा केला पाहिजे, परीक्षेच्या कालावधीमध्ये आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे, यावर सखल व अमूल्य मार्गदर्शन करण्यात आले. 

    या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी शुभम विजय आडीत, संजना संदीप केम्बले, सलोनी विश्वास मौले, हिरनाक्षी हरेश मोरे व माणगांव विभागाचे प्रकल्प अधिकारी उल्हास सावंत, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद विचारे, मिनाक्षी उभारे, सचिन दगडघाटे व शिक्षिका स्मिता काटू व सोनल विचारे उपस्थित होते.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: