माणगांव बस स्थानकात महिलेचे मंगळसूत्र व रोख रक्कम चोरीला

     बोरघर / माणगांव  ( विश्वास गायकवाड  )  माणगांव जि.रायगड इथं बस स्थानकात एसटी मध्ये चढताना महिलेचे मंगळसूत्र व रोख रक्कम चोरीला गेली आहे.

याबाबत माणगांव पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास निळगून येथील महिला माणगांव बस स्थानकात बसमध्ये चढत असताना या महिलेच्या खांद्यावर अडकवलेल्या पर्सची चैन कोणीतरी अज्ञात इसमाने उघडून त्यातील ७५,७००/- रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम चोरी करण्यात आली. 

     माणगांव बस स्थानकात भुरट्या चोरांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सर्वसामान्य प्रवाशांची या भुरट्या चोरांकडून लूटमार होत असून, बस स्थानकाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.

या घटनेबाबत माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. १२८/२०१९ भा. द. वि. स. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो. ह. एस. कदम करीत आहेत.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: