शिवसंग्रामचे प्रदेश सचिव आंबरे यांची कोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी निवड

       बोरघर / माणगांव  ( विश्वास गायकवाड  )  शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद या सामाजिक व राजकीय संघटनेच्या इतिहासात गुरुवार दि.२२ ऑगस्ट हा एक सोनेरी दिवस ठरला. कारण याच दिवशी  शिवसंग्रामचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस, शिवसंग्रामचे जेष्ठ नेते कुशल संघटक  श्री विक्रांतजी आंबरे ह्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाचा (राज्यमंत्री दर्जा) अधिकृत पदभार स्वीकारला. ठाणे येथील कोकण पाटबंधारे विभागाच्या सिंचन भवन , कोपरी येथे शिवसंग्रामचे संस्थापक श्री. विनायकजी मेटे यांच्या प्रमुख, आणि विविध मान्यवरांच्या लक्षणीय  उपस्थितीत  हा कार्यक्रम संपन्न झाला.

       सदर प्रसंगी शिवसंग्रामचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे, शिवसंग्राम रायगड जिल्हाध्यक्ष मा. अविनाश सावंत, जिल्हा सरचिटणीस अनंत देशमुख, कर्जतचे श्री. रमेश मते, कोकण महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी  आणि अनेक क्षेत्रांतील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री विक्रांतजी आंबरे  कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदावर विराजमान झाल्याने, शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यामुळे त्यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा द्यायला जातीने हजर होते.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: