शाहूवाडी पोलीस दलामार्फत गणराया अवार्ड २०१८ चे वितरण

 शाहूवाडी ( गोरक्ष सकटे): शाहूवाडी पोलीस ठाणे च्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या गणराया अवार्ड २०१८ पुरस्काराचे वितरण आज दिनांक २९ ऑगस्ट २०१९ रोजी शाहूवाडी येथील संकल्प सिद्धी कार्यालयात करण्यात आले.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार चंद्रशेखर सानप व होते तर प्रमुख उपस्थिती मा. अनिल कदम पोलीस उपाधीक्षक शाहूवाडी हे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहूवाडी पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गणराया अवॉर्ड २०१८पुरस्कार वितरण व एक गाव एक गणपती, डॉल्बी मुक्ती अशा उल्लेखनीय मंडळांना गौरविण्यात आले.

 गणराया अवार्ड 2018 प्रथम क्रमांक – न्यूआव्हान कला क्रीडा शैक्षणिक मंडळ कडवे मोरेवाडी, द्वितीय क्रमांक व्यंकटेश तरुण मंडळ बांबवडे, तृतीय क्रमांक फ्रेंड्स तरुण मंडळ सरूड, उत्तेजनार्थ क्रमांक शिवशक्ती तरुण मंडळ साळशी. एक गाव एक गणपती उपक्रमासाठी अशा २१ मंडळांना व गतवर्षी झालेल्या गणेशोत्सवामध्ये पोलीस प्रशासन बंदोबस्तामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष पोलीस अधिकारी व गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांना प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी पेरीड  चे सरपंच संजय पाटील, अनिकेत हिरवे, प्रसाद कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी शाहूवाडी पोलीस उपअधीक्षक अनिल कदम म्हणाले कि, गणेशोत्सव शांततेत व उत्साहाने साजरा करा, शांतता व सहकार्य करा, बेशिस्त पणाने वागणाऱ्या मंडळावर कडक कारवाई केली जाईल.

 अध्यक्षस्थानावरून बोलताना  तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी शाहूवाडी तालुका शांततामय असून, दरवर्षीप्रमाणे याहिवर्षी सर्व गणेश मंडळे गणेश उत्सव शांततेत साजरा करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. आणि सर्व विजेत्या गणेश मंडळांचे अभिनंदन केले तर सहभागी मंडळांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शाहूवाडी पंचायत समिती सदस्य विजय खोत,  तालुक्यातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते, पोलीस पाटील, पोलीस व होमगार्ड कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संतोष कुंभार यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार पोलीस उपनिरीक्षक सराटे मॅडम यांनी मानले.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: