संजयदादांच्या छाव्याला सूर्योदयाचा गुलाल…

बांबवडे : एकेकाळी सह्याद्रीच्या कड्याकपारीत डरकाळणारा वाघ अनंतात जरी विलीन झाला असला, तरी त्याच्या छाव्याचे नव्याने पुनरागमन  झाले आहे. मा.कर्णसिंह गायकवाड यांची  महाराष्ट्र राज्याच्या यंत्रमाग महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने सह्याद्रीच्य कड्याकपारीत मळकटलेला मावळा पुन्हा एकदा जिद्दीने सरसावला आहे.कारण कर्णसिंह यांच्या रूपाने पुन्हा एकदा संजयदादा शाहुवाडीच्या कड्याकपारीत वावरताना दिसतील . त्यांच्या या निवडीबद्दल शाहुवाडीच्या जनतेत जल्लोष निर्माण झाला असून त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. सा.शाहूवाडी टाईम्स व एस.पी.एस.न्यूज च्या वतीने मनपूर्वक अभिनंदन.

     जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनयरावजी कोरे यांनी एका विकास कामांच्या कार्यक्रमात,  “ कर्णसिंह यांच्या नागरी सत्काराच्या तयारीला लागा ” या वाक्यातील गमक, आजच्या या निवडीने शाहूवाडी पन्हाळा मतदार संघासमोर उघड झाले आहे.

     कर्णसिंह गायकवाड यांना बऱ्याच अपयशानंतर मिळालेल्या यशाची गोडी निश्चितच अवीट असणार आहे. त्याचबरोबर भविष्यातील त्यांच्या राजकीय वाटचालीस चालना मिळणार आहे. गेली दहा वर्षे संजयदादा गटाच्या कार्यकर्त्याला झालेल्या जखमा, आज मात्र आनंदाच्या महापुराने भरून निघणार आहेत. भविष्यात सह्याद्रीच्या या छाव्याला आभाळ ठेंगणे होणार आहे, याबाबत शंका नाही. पुनश्च कर्णसिंह गायकवाड यांचे अभिनंदन. तसेच मा.विनयरावजी कोरे यांचे जनतेतून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

13+
13+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: