…आपल्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबाची किंमत होईल…

बांबवडे : पराभवाचे पर्वत चढल्याशिवाय यशाचे हिमशिखर दिसत नाही. याची जाणीव झाली, आणि सह्याद्रीच्या कड्याकपारीत डरकाळणाऱ्या सिंहाच्या छाव्याच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहू लागला. याची जाणीव उपस्थितांना झाली, आणि या अश्रूंच्या प्रत्येक थेंबाची किमत मोजल्याशिवाय गप्प बसणार नाही, याची उपस्थितांनी मौन शपथ घेतली. हि घटना सर्वच संजयदादा प्रेमी जनतेच्या समोर घडल्याने कर्णसिंह गायकवाड यांनी सर्वांची माफी मागितली.

हि घटना एवढी हृदय द्रावक होती ,कि काही काळ शांतता पसरली. व्यासपीठावर काय घडतंय, हे कोणालाच समजले नव्हते, पण नंतर मात्र पुन्हा एकदा सह्याद्रीचा छावा डरकाळी फोडून उठला. हा कर्ण महाभारतातील कर्णाप्रमाणे यशापयशाची पर्वा न करता लढत राहील,अशी त्यांनी उपस्थितांना ग्वाही दिली.

 या दरम्यान एक राजकीय व्यक्तिमत्व इतकं हळवं असू शकतं का? हा प्रश्न उपस्थितांना पडला. परंतु वेदना ह्या वेदनाच असतात, त्या प्रत्येक मानवाला सारख्याच असतात. मनात एवढं दुःख बाळगणारा नेता चेहऱ्यावर मात्र नेहमीच आनंदी दिसायचा. पराभवाच्या जखमांनी विव्हळ झालेल्या या व्यक्तीला, शेंबडं पोर सुद्धा सल्ला देवू लागलं. “ बाळ तुम्ही फिरत नाही, फिरायला लागतंय ” , हे सांगणाऱ्यांची गणना तर विचारूच नका. माझ्यासहित अनेक हितचिंतकांनी सल्ले दिले. परंतु ज्याचं दुखणं त्यालाच माहित असतं, याची काल झालेल्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमावरून जाणीव झाली. हे सगळं त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटीच होतं, परंतु जखमांचं दुखणं च न पेलवणारं होतं. नुकत्याच मिळालेल्या पदामुळे त्या जखमांवर हळूवर फुंकर घातली गेली. आणि त्या फुंकर घालणाऱ्या व्यक्तिमत्वासाठी पडेल ती किंमत द्यायला,संजयदादा गट हिरीरीने पुढे आला.

दरम्यान काही मंडळी म्हणतात कि,ते महामंडळ बंद पडू लागलं आहे. त्यामुळे त्यांना दिलं. हे खर असेलही,पण इतरांना मग का नाही मिळालं? हा प्रश्न पुढे आलाच. आणि ते जरी बंद पडू लागलं, तरी त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम हे व्यक्तिमत्व निश्चितच करेल. भविष्यात या नेतृत्वाला उज्वल राजकीय पाठबळ लाभेल,अशीच अपेक्षा संजयदादा प्रेमी जनता करीत आहे.

6+
6+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: