महाराष्ट्रातील किल्ले कोणाची जहागिरी नाही- किसन महाराज

बांबवडे : छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी रक्त सांडून मिळवलेले, तसेच राखून ठेवलेले गडकोट किल्ले, शासन भाडेतत्वावर देण्याच्या तयारीत आहेत. हे गडकोट किल्ले कोणत्याही पक्षाची अथवा, शासनाची जहागिरी नसून, छत्रपती शिवाजी महाराज व धारातीर्थी पडलेल्या त्यांच्या मावळ्यांची चिरकाल असणारी आठवण आहे. हे गडकोट किल्ले पर्यटनासाठी खुले करावेत, त्याचबरोबर त्यांची देखभाल दुरुस्ती शासनाने करावी, अशी मागणी छावा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष किसान महाराज लोहार यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाने किल्ले भाडे तत्वावर देण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णया विरोधात छावा युवा संघटनेच्यावतीने बांबवडे इथं रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी मराठा महासंघाचे सुनील पाटील, राजराम पाटील, संतोष लोहार, आशुतोष राबाडे, अजित खुटाळे, सचिन राबाडे, प्रकाश चव्हाण, राहुल चव्हाण, अक्षय खोत, ज्ञानेश्वर खुटाळे, शिवाजी पाटील व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख व पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त होता.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: