संजय जगताप सर यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार

मलकापूर : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातून प्राथमिक विभागात श्री संजय शंकर जगताप सर केंद्रीय प्राथमिक शाळा माण,ता.शाहूवाडी यांना देण्यात आला आहे.

हा पुरस्कार शिक्षक दिन ५ सप्टेंबर २०१९ रोजी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नाम. आशिष शेलार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम. विनोद तावडे, विशाल सोळंकी शिक्षण आयुक्त, आ. कपिल पाटील, आम. सरदार तारासिंग, दिनकर पाटील संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, द.गो. जगताप संचालक प्राथमिक, या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

श्री संजय जगताप सर यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित सिंगापूर देशाचा शैक्षणिक अभ्यासदौरा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. सिसिआरटी नवी दिल्ली आयोजित कार्यानुभव, आपली सांस्कृतिक विविधता, बाहुली नाट्य इ. विषयांची प्रशिक्षणे पूर्ण केली आहेत. शाळा सिद्धी मध्ये राज्य निर्धारक तसेच राज्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. मायक्रोसॉफ्ट आयटी अॅकॅडमी यांचेमार्फत जिल्हा तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. जटा निर्मुलन, अंधश्रद्धा निर्मुलन यामध्ये भरीव काम केले आहे. विज्ञान प्रदर्शन मध्ये जिल्हा व राज्य स्तरावर विशेष प्राविण्य मिळविले आहे. समाजातील वंचित घटकांसाठी, आनंदमय दिवाळी, माणुसकीची भिंत, गरीब विद्यार्थी दत्तक-पालक योजना इ. सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला आहे. शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षांमध्ये त्यांचे विद्यार्थी चमकले आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियानात सक्रीय सहभाग घेतला आहे. शिक्षण विभागामार्फत आयोजित विविध प्रशिक्षणात तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे.

2+
2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: