विद्यामंदिर शिंपे च्या विद्यार्थिनींची जिल्हास्तरावर निवड

सरूड : शिंपे तालुका शाहूवाडी येथील विद्यामंदिर शिंपे च्या विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय झालेल्या पावसाळी शालेय स्पर्धेत खोखो या खेळात विद्यामंदिर घुंगुर या शाळेवर मात करीत, तालुकास्तरावर त्यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजय मिळवला. या विजयामुळे त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यामंदिर शिंपे ने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे.

शिंपे शाळेतील वैष्णवी पाटील, आशीषा लोहार, माधवी पाटील या तिघींनी अष्टपैलू खेळी केली, तर प्रतीक्षा पाटील व वृषाली पाटील यांनी त्यांना उत्तम साथ दिली.

या संघामधून धनश्री पाटील, अरुंधती जाधव, समीक्षा जाधव, पायल पाटील, अर्पिता पाटील, आदिती पाटील या विद्यार्थिनी खेळल्या होत्या.

या विद्यार्थिनींना प्रशिक्षक गोरक्ष सकटे, तात्या कुंभोजे, क्रीडा शिक्षक बी.पी. माने, सर्जेराव पाटील, मुख्यध्यापक पेटकर, केंद्रप्रमुख सिद या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.

2+
2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: