बांबवडे त सामाजिक शांततेच्या भंगाचा गुन्हा दाखल

बांबवडे : बांबवडे तालुका शाहूवाडी येथील टर्निंग पॉईंट हॉटेल च्या बाहेर दोघांवर सामाजिक शांततेचा भंग केल्याच्या आरोपाखाली शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर टर्निंग पॉईंट हॉटेल च्या बाहेर शरद गणपती भंडारे (वय ३२ )रहाणार सरूड,सध्या बांबवडे, संदीप पांडुरंग खोत (वय ३५ )भैरेवाडी ता.शाहूवाडी  हे दोघे दि.११-०९-२०१९ रोजी रात्री साडे अकरा वाजनेच्या दरम्यान दारू पिऊन रस्त्यावर मोठ-मोठ्याने आरडा-ओरडा करून सामाजिक शांततेचा त्यांनी भंग केला. याबाबत अधिक तपास पो.हे.कॉ.अपराध करीत आहेत.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: