कमी कालावधीत पोलिसांनी लावला खुनाचा छडा :सूत्रधारास चौघे जेरबंद

बांबवडे : स्वत:च्या मावसभावाचा खून करणाऱ्या संशयित आरोपी संजय शेडगे व त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात कोल्हापूर, इचलकरंजी व शाहूवाडी पोलिसांना यश मिळाले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंबा-विशाळगड रोड वर मानोली गावच्या हद्दीत कोकण दर्शन पॉईंट इथं सुमारे २५ ते ३० वर्षे वय असलेल्या तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून त्याचे शव आंबा घाटाच्या दरीत फेकून दिले होते. या घटनेतील मयत संतोष मोहन तडाके (वय २८ वर्षे ) रहाणार गुरुकनानगर गल्ली नं.५ इचलकरंजी तालुका हातकणंगले जि.कोल्हापूर हा दारू पिण्यासाठी लोकांकडून पैसे मागत असे, तसेच लोकांना शिवीगाळ करत असे. त्याला त्याच्या गल्लीवर स्वत:चे वर्चस्व निर्माण करायचे होते. या रागातून त्याचा मावस भाऊ संजय शेडगे हा त्याच गल्लीत रहात असल्याने त्याचा त्याला राग येत होता. म्हणून त्याने त्याचे साथीदार १)आमीर उर्फ कांच्या मुल्ला २) सुनील खोत ३) सिद्धू म्हेत्रे तिघे राहणार इचलकरंजी यांना सोबत घेवून संतोष तडाके चा खून केला. याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सपोनि संतोष पोवार, विकास जाधव, व शाहूवाडी चे भालचंद्र देशमुख व त्यांच्या पथकाने आरोपींची नावे निष्पन्न केली. यास पोलीस नाईक जितेंद्र भोसले, पो.हे.कॉ. विजय कारंडे यांनी खात्रीशीर माहिती पुरविली.

सदर गुन्ह्याचा सूत्रधार संजय शेडगे व त्याच्या साथीदारांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.

हि कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, श्रीनिवास घाडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत संतोष माने, कृष्णात पिंगळे, रवींद्र कांबळे, अर्जुन बाद्रे, किरण गावडे, तुकाराम राजीगरे, रफिक आवळकर, प्रदीप पोवार, संजय पडवळ, महेश कोरे, विजय तळसकर,वैभव दड्डीकर, रणजीत पाटील, अमर शिरढोणे, सुरज चव्हाण, राजू पट्टणकुडे, प्रकाश कांबळे, श्रीकांत दाभोळकर, भरत मोळके,दिगंबर चिले, विनोद जाधव आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी या धडक कारवाईत सहभाग घेतला होता. अधिक तपास शाहूवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि भालचंद्र देशमुख करीत आहेत.  

2+
2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: