वाढदिवस “ आपल्या माणसाचा ” :श्री विजयराव बोरगे जि.प.सदस्य

बांबवडे : बांबवडे जिल्हापरिषद मतदारसंघाचे सदस्य श्री विजयराव बोरगे (पैलवान )यांना त्यांच्या वाढदिवसानिमित साप्ताहिक शाहूवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

बोरगे पैलवान म्हणजे बांबवडे मतदारसंघातील “ आपला माणूंस ” होय. या व्यक्तीची मानसिंगराव गायकवाड दादा यांच्यावर आणि त्यांच्या परिवारातील प्रत्येक घटकांवर अपार श्रद्धा. हे सांगण्याचं मूळ कारण म्हणजे यांच्या वाक्याची सुरुवातच दादा या शब्दाने होते. आपला हा माणूस जिल्हापरिषद मध्ये आपल्या तालुक्याचं नाव मात्र गाजवीत आहे. कारण तेथील प्रत्येक कार्यालयातील कर्मचारी सुद्धा या व्यक्तीला व्यक्तीश: ओळखतो. त्यामुळे सर्व सामन्यांची कामे मार्गी लागतात. आपल्या मानधनाचा भाग या व्यक्तीने पूरग्रस्तांसाठी आपलं कर्तव्य म्हणून दिला, मदत म्हणून नाही. अशा या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस मात्र इथून पुढे नेहमीच स्मरणात राहील, याचे कारण हि व्यक्ती अतिशय प्रामाणिक आहे. खुल्या मानाने प्रत्येकाचे स्वागत करत असते, आणि आपल्या तालुक्याला जि.प.मधून किती निधी आणता येईल, याच्याच प्रयत्नात असते. राजकीय क्षेत्रात जनतेसाठी राबणं हा गुण अतिशय महत्वाचा असतो.

अशा या आपल्या माणसाचा वाढदिवस आपण आपल्या सदिच्छा देवून आपण साजरा करू या. देवळातला देव सुद्धा दगडाचाच असतो, आणि रस्त्यावरील एखाद्या झाडाखाली असलेला देव सुद्धा दगडाचाच असतो. देवळात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. कारण त्या देवाचं ते अधिकृत ठिकाण असतं. पण रस्त्याजवळील झाडाजवळ असलेल्या देवाला, कुणी जाणून-बुजून जरी जात नसलं, तरी भक्तीभाव असलेली मंडळी जाता-येता नमस्कार निश्चितच करत जातात. आणि त्यांची संख्या सर्वाधिक असते. कारण इथल्या भक्तीत मनातला भाव अधिक असतो. असं हे व्यक्तिमत्व भविष्यात निश्चित पुढे यावे, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीस पुनश्च मन:पूर्वक शुभेच्छा…

3+
3+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: