आमदारांच्या विजयाने ओटी भरा, स्वराज्य आल्याशिवाय राहणार नाही-सौ.अनुराधाताई पाटील

बांबवडे : राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांचे गुण अंगीकारून तुमचे विद्यमान आमदार वाड्या-वस्त्यांसाहित सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या कामांची पोहोचपावती म्हणून तुम्ही माता-भगिनींनी अलोट जनसागर तयार करून दिली आहे. आता फक्त त्यांचा विजय आमची ओटी भरा, निश्चित जनतेला अपेक्षित स्वराज्य आल्याशिवाय राहणार नाही. असे भावनोत्कट उद्गार गोकुळ च्या संचालिका व आम.सत्यजित पाटील यांच्या मातोश्री सौ. अनुराधाताई पाटील यांनी काढले.

बांबवडे येथील ठमकेवाडी फाट्याजवळ “ प्रथम ती ” हा महिलांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सौ. अनुराधाताई पाटील बोलत होत्या.

यावेळी महिलांची खूप मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहूवाडी पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. सौ.स्नेहा जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन शाहीर अनिल तळप यांनी केले.

यावेळी मुंबईच्या नगरसेविका किशोरीताई पेडणेकर म्हणाल्या कि, शाहूवाडी मतदारसंघ हा कोल्हापूर जिल्ह्यात येतो, आणि येथील गादी छत्रपती ताराराणी यांनी चालविली होती. त्यामुळे तुम्ही इथं जमलेल्या प्रत्येक जनी ताराराणी आहात. हे मी नव्हे, तर इतिहास सांगतो. झालेला इतिहास होता, आणि आता आपल्याला नवीन इतिहास घडवायचा आहे. दारू, आणि मटण वाटून आपल्या नवऱ्यांना, आणि मुलांना दारुडा बनविण्याचे षड्यंत्र आहे. विरोधक पैसे वाटून आपली किमत आठ-ते दहा पैसे दिवसा करतात, अशा विरोधकांना जागा दाखवणे गरजेचे आहे. आपण “ “ “ प्रथम ती ” आहात. म्हणजेच आदिशक्ती करवीर निवासिनी आहात, मग विरोधक निवडून येतीलच कसे? “प्रथम ती” हि संकल्पना स्त्रीला स्वावलंबन शिकवण्यासाठी युवा नेते आदित्य ठाकरे यांची आहे. यासाठी महिलांचे बचत गट निर्माण करून त्याचे नाव मातोश्री फेडरेशन ला संलग्न करा. त्यामुळे आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून कसा फायदा मिळतो. ते आम्ही तुमच्यापर्यंत सांगू. पूरग्रस्तांना मदत करण्याचे आदेश प्रथम उद्धव ठाकरे साहेबांनी दिले. जगात स्त्री नसेल, तर अंधारच आहे. कारण स्वराज्य निर्माण करण्याचे डोहाळे प्रथम जिजाऊ माँसाहेबांना लागले, आणि त्यांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून साकारले. प्रत्येक चांगल्या गोष्टीमागे चांगल्या स्त्रीचा आशीर्वाद असावा लागतो. ‘ रक्तात संस्कार आणि मनात संकृती ’ असली, कि निश्चितच उज्वल भवितव्य निर्माण होते. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला आहात, याचा अर्थ विद्यमान आमदार सत्यजित पाटील पुन्हा आमदार होतील, आणि सत्याची जीत होईल. असेही किशोरीताई पेडणेकर यांनी सांगितले.

यावेळी नाशिक च्या डॉ.स्नेहल मांडे म्हणाल्या कि, “ प्रथम ती ” मध्ये पंचसूत्री सामावली आहे. ती म्हणजे समता, संरक्षण, स्वावलंबन, शिक्षा, सुरक्षा. महिलांना आजपर्यंत चूल-मुल इथपर्यंतच मर्यादित ठेवलं जात होत. पण आता महिलांनी गप्प न बसता बोललं पाहिजे.

यावेळी शुभांगीताई पोवार, मंगलाताई चव्हाण, जि.प.सदस्य आकांक्षा पाटील जि.प.स. आदींनी मनोगते व्यक्त केलीत.

यावेळी सौ. वेदांतिका धैर्यशील माने, महिला आघाडी च्या श्रीमती अलका भालेकर, सौ.लक्ष्मी नामदेवराव पाटील सावेकर, पं.स.स. लताताई पाटील, पन्हाळा तालुका अध्यक्ष सौ. दीप्ती कोळेकर, युवती सेना प्रमुख तेजश्री पाटील, पल्लवी बाऊचकर, सुवर्णा दाभोळकर, माजी उपसभापती नामदेवराव पाटील सावेकर, सुधाकर पाटील, उपजिल्हाप्रमुख नामदेवराव गिरी, तालुकाध्यक्ष दत्ता पोवार, योगेश कुलकर्णी, यांच्यासहित महिला मेळाव्याचे संयोजन करण्यासाठी शिवसैनिक उपस्थित होते.

मेळाव्याचे आभार शाहूवाडी पंचायत समिती च्या सभापतींनी मानले.

2+
2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: