सेनेला वाचविण्यासाठी विद्यमान आमदारांना विरोध करून कोरे यांना पाठींबा-श्री.काटकर

मलकापूर : खऱ्या अर्थाने शिवसेना वाचविण्यासाठी विद्यमान आमदारांना विरोध करून जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा श्री विनयराव कोरे यांना आम्ही पाठींबा देत आहोत. कारण आमदारांनी शिवसेना ऐवजी स्वत:चा गट वाढविण्यात धन्यता मानली. निष्ठावंत शिवसैनिक आहे तिथेच राहिला असून, हा विरोध शिवसेनेला नसून, त्यांच्याआड आपला गट वाढविण्याचे षड्यंत्र रचणाऱ्यांविरोधात आहे. असे मत शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख जयवंतराव काटकर यांनी येलूर इथं झालेल्या मेळाव्यात व्यक्त केले.

यावेळी जयवंतराव काटकर पुढे म्हणाले कि, गेल्या दहा वर्षांपासून निष्ठावंत शिवसैनिकांची कदर झालेली नाही. शिवसेनेची ज्यांनी बांधणी केली, ती मंडळी सगळी कट्ट्यावर बसवली गेली. आणि सेनेच्या आडाने फक्त आपला गट वाढविण्याचे काम केले गेले. याच रागापोटी बिनशर्थ पाठींबा विनयरव कोरे यांना काटकर गटाच्यावतीने युवराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली दिला आहे. असेही जयवंतराव काटकर यांनी सांगितले.

यावेळी जनसुराज्यशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे म्हणाले कि, स्वत:ला शिवसैनिक म्हणवणाऱ्या आमदारांचा इतिहास तपासा, म्हणजे ते, पक्षाशी किती बांधील होते, याची आपणास जाणीव होईल. काही वर्षांपूर्वी राजकारणात पक्षांतर घडले होते, त्यात याच तालुक्यातील नेत्यांनी पुढाकार घेतला. आणि शिवसेना सोडण्याचे पाप त्यांनी केले.

यावेळी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, माजी सभापती सुभाषराव इनामदार, बबन पाटील, रंगराव खोपडे, नामदेव बांदरे, सुरेश चांदणे, पांडुरंग पाटील, राजाराम केसरे, बाजीराव पाटील, दिनेश पडवळ, आदी मान्यवर उपस्थित होते.

3+
3+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: