वारणेच्या मुठीतील गुलाल आता आसमंतात उधळणार- गामाजी ठमके

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यात आपल्याला केवळ गृहीत धरण्यात आलं. काही ठराविक माणसं नेहमी आपल्या आजूबाजूला असली,कि बाकी सगळी पळत सुटतात. असं समीकरण तालुक्यात आजपर्यंत घडत आहे. परंतु हि परंपरा आता खंडित होणार आहे, कारण वारणेच्या मुठीतील गुलाल आता आसमंतात उधळणार आहे, असे मत शाहूवाडी विकास मंच चे अध्यक्ष गामाजी ठमके यांनी सा. शाहूवाडी टाईम्स शी बोलताना व्यक्त केले.

शाहूवाडी विकास मंच चे अध्यक्ष गामाजी ठमके यांनी जनसुराज्यशक्ती पक्षात आपल्या सहकाऱ्यांसह प्रवेश केला. त्यांच्यासोबत पनुंद्रे चे बापूसाहेब शिंदे, सुर्यकांत पाटील, बळीराम पाटील यांच्यासह आमदार सत्यजित पाटील गटातील अनेक कार्यकर्त्यांनी जनसुराज्यशक्ती पक्षात प्रवेश केला. गामाजी ठमके यांच्या मागील दोन पिढ्या आमदार सत्यजित पाटील गटाशी प्रामाणिक होत्या. परंतु त्यांच्या एकनिष्ठते चे चीज झाले नाही. गेल्या दोन ते तीन वर्षात आमदार गटाने केवळ मतदानासाठी वापर करून घेतला. पण आम्हाला नेहमीच सापत्न भावाची वागणूक दिली,यामुळे आम्ही माजी मंत्री विनय कोरे यांच्या गटात प्रवेश केला आहे. असेहि  श्री गमाजी ठमके यांनी सांगितले.

4+
4+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: