स्वाभिमानी शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघ लढवणार- माजी खास.राजू शेट्टी

बांबवडे : शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघ आमच्यासाठी सोडा,इथून स्वाभिमानी चा उमेदवार निवडणूक लढणार आहे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडी कडे करणार आहे. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी कडून अमरसिंह पाटील यांनी हि निवडणूक लढविली होती. बांबवडे इथं झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी खास. राजू शेट्टी बोलत होते.

यावेळी शेट्टी पुढे म्हणाले कि, आमच्या संघटनेचे बरेचशे मतदान शाहुवाडीत आहे. गेल्या दहा वर्षात शाहूवाडी ने आम्हाला आघाडी दिली होती, त्यामुळे आमच्या शेतकरी बांधवांचा एक गट स्वबळावर इथं कार्यरत आहे. आमच्या शेतकरी बांधवांसाठी आम्ही येथून निवडणूक लढवणार आहोत. यासाठी चरण चे  जयसिंग पाटील, व अन्य दोन पन्हाळा तालुक्यातील कार्यकर्ते असून, यापैकी एक हि विधानसभा निवडणूक लढणार आहे, असेही माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: