जनसुराज्य शक्ती पक्षाचे समर्थक कृष्णा पाटील यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला

शाहूवाडी : जनसुराज्य शक्ती पक्षाचे समर्थक व विरळे गावचे सरपंच कृष्णा पाटील यांच्यावर काल दि.१३ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री साडेआठ वाजनेच्या दरम्यान अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. अशी फिर्याद शाहूवाडी पोलीस ठाणे इथं दिल्याची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली.

याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, कृष्णा पाटील हे सरूड इथं कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेण्यासाठी गेले होते. कार्यकर्त्यांना भेटून परत विरळे कडे जात असताना, वडगाव व कापशी गावाच्या दरम्यान दुचाकीवरून दोन अज्ञात इसम आले. एकाने डोक्यात हेल्मेट घातले होते, तर एकाने कानटोपी घातली होती. आमच्या गावात येवून निवडणूक बद्दल काही सांगायचे नाही, असे म्हणत, त्यांनी दगडफेक केली. यात कृष्णा पाटील यांच्या डोक्याला मार लागाला. तसेच त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले. त्यांना मलकापूर इथं ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले. अशी माहिती खुद्द कृष्णा पाटील यांनी दिली.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: