विजयाच्या गुलालाने दिवाळी साजरी करण्यासाठी कोरे यांच्या पाठीशी रहा- शुभलक्ष्मी कोरे

बांबवडे : विजयाच्या गुलालाचा रंग गुलाबी असतो, आणि आपल्याकडे आपल्या झेंड्याचा रंग सुद्धा गुलाबी आहे. त्यामुळे आपण सगळ्याजणी मिळून एक होवू या, आणि विजयाची दिवाळी साजरी करू या, असे मत शुभलक्ष्मी कोरे यांनी व्यक्त केले.

बांबवडे तालुका शाहूवाडी, येथील बाजारपेठेत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी “ तुझ्यात जीव रंगला ” या मालिकेतील अभिनेत्री धनश्री कडगावकर ( नंदिता वहिणी ) यांची उपस्थिती प्रेक्षणीय ठरली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती शोभाताई कोरे या होत्या.

यावेळी शुभलक्ष्मी कोरे पुढे म्हणाल्या कि, विकासाला मदत करण्यासाठी कर्णसिंह भाऊ यांनी विनय कोरे यांना समर्थन दिले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मतदारसंघ शाहूवाडी व पन्हाळा अशा दोन तालुक्यांनी मिळून तयार झाला आहे. आमच्या पन्हाळा तालुक्यात बऱ्याच अंशी विकासाची कामे पूर्ण झाली असून, त्याची पोच पावती सुद्धा जनता देत आहे. आता शाहूवाडी तालुका जो विकासापासून वंचित आहे, त्यास सक्षम करायचा आहे, यासाठी विनय कोरे यांच्या नारळाच्या बागेसमोरील चिन्हाचे बटन दाबून त्यांना विजयी करावे, ज्या माध्यमातून शाहूवाडी तालुक्यात सुद्धा विकासाची गंगा वाहू लागेल.

यावेळी श्रीमती शोभाताई कोरे म्हणाल्या कि, वारणे सारखा उद्योग समूह या शाहूवाडी तालुक्यात उभारून इथं सुद्धा विकासाची गंगा आणावी लागणार आहे. इथं सुद्धा महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत, यासाठी विनयशील नेतृत्व गरजेचे आहे, म्हणूनच विनय कोरे यांना आपण सगळ्यांनी मिळून त्यांना निवडून आणू या, असे आवाहन सुद्धा शोभाताई कोरे यांनी केले.

यावेळी डॉ. प्रीती शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलताना सांगितले कि, विनय कोरे सावकर यांच्यासारखे धुतल्या तांदळासारखे नेतृत्व निवडून आणण्याची ताकद, इथं बसलेल्या शाहूवाडी च्या सिंहिणींमध्ये आहे. कारण स्वराज्य निर्माण करण्यासाठी जिजाऊ मातेचे योगदान होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. तेच काम तुम्हा माताभगीणींना करायचे आहे.

यावेळी धनश्री कडगावकर यांनी मेळाव्यास आलेल्या माताभगिनींना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी महिला बालकल्याण समिती च्या सभापती भाग्यश्रीदेवी गायकवाड म्हणाल्या कि, शाहूवाडी – पन्हाळा मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी विनय कोरे यांना निवडून देणे,हि काळाची गरज आहे.

यावेळी प्रसिद्ध व्याख्याते वसंतराव हंकारे यांनी यांनी आई या स्त्री च्या रुपाबद्दल आणि एक आई काय करू शकते, हे त्यांच्या ओजस्वी वाणीद्वारे महिलांना संबोधित केले. याचबरोबर संस्काराचा धुमधडाका, जिद्दीचा धुमधडाका हा झाला पाहिजे,आणि हे इथं बसलेली प्रत्येक माता घडवू शकते, असे सांगितले.

यावेळी वैशाली कोरे, तसेच गुरुराज साळोखे या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी स्नेहा कोरे, वनश्री लाड, अश्विनी दळवी परखंदळे, संगीता पाटील शित्तूर तर्फ मलकापूर सरपंच, सौ. वैशाली बोरगे, अमृता पाटील, विष्णू यादव, महादेव पाटील, स्वप्नील घोडे-पाटील, सुरेश नारकर, माजी सभापती पंडितराव नलवडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

विरळे चे सरपंच कृष्णा पाटील यांनी आभार मानले.

2+
2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: