तालुक्याला उद्यमशील बनविण्यासाठी कोरेसाहेबांना निवडून द्या- कर्णसिंह

बांबवडे : शाहूवाडी – पन्हाळा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडणे,हि काळाची गरज असून, तालुक्याला उद्यमशील घडवणे, हे फक्त विनय कोरे साहेब करू शकतात. जर भविष्यातील तरुण पिढी बेरोजगारीपासून दूर ठेवायची असेल,तर विकासाचा आराखडा ज्यांच्याकडे आहे, अशा कोरेसाहेबांनाच निवडून देणे,हि  काळाची गरज आहे. असे कर्णसिंह गायकवाड यांनी पद्यात्रेवेळी सा.शाहूवाडी टाईम्स शी बोलताना सांगितले.

बांबवडे पंचक्रोशीत जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांची पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. बांबवडे तालुका शाहूवाडी इथं यंत्रमाग महामंडळाचे उपाध्यक्ष कर्णसिंह गायकवाड, येथील युवा नेते विष्णू यादव, स्वप्नील घोडे-पाटील, सुरेश नारकर अशा सर्वच कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत सहभाग घेतला होता.

 कर्णसिंह गायकवाड पुढे म्हणाले कि, सध्याची शाहूवाडी तालुक्यातील विधानसभेची निवडणूक अटीतटी ची होत असून, जनसुराज्यशक्ती पक्ष परिवर्तनाच्या दिशेकडे झपाट्याने वाटचाल करताना दिसत आहे. विरोधकांनी केलेले विकासाचे दावे काहीही असले, तरी तालुक्यात औद्योगिक प्रगती झालेली नाही, हे कोणीच नाकारू शकत नाही. रस्ते हे जरी विकासाच्या रक्तवाहिन्या असल्या, तरी त्या रस्त्यांवरून ये-जा करण्यासाठी लागणारी वर्दळ, आर्थिकमान वाढविणारी असली पाहिजे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण रस्ते असले, तरी त्या रस्त्यावर धावणाऱ्या एसटी बसेस चे अर्निंग अभावी थांबणे, ह्या गोष्टी नाकारता येत नाही. शाहूवाडी च्या उत्तर भागात आजही एसटी बस दिवसातून किती वेळा फेऱ्या मारते, हे विचार करण्यासारखे आहे. असे तालुक्याचे नेते कर्णसिंह गायकवाड यांनी सा.शाहूवाडी टाईम्स शी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, यासाठीच परिवर्तन घडणे, हि काळाची गरज आहे.

यावेळी श्री विनय कोरे यांनी पद्यात्रेद्वारे मतदारांशी संपर्क साधला आणि येत्या निवडणुकीत नारळाची बाग या चिन्हासमोरील बटन दाबून विकासाला साथ देण्याचे आवाहन केले.

2+
2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: