श्री.कोरेंच्या विजयी रथास भाऊंच्या शिलेदारांचाही खांदा

बांबवडे : श्री. विनय कोरे यांच्या विजयात आणखी एका पवित्र आत्म्याचा सहभाग आपणास विसरून चालणार नाही. आणि ते म्हणजे सर्वसामान्य जनतेची हाक ऐकणारं, आणि काळाच्या पडद्याआड गेलेलं नेतृत्व, अशोकराव घोडे-पाटील अर्थात भाऊ,हे होय. सध्या त्यांची धुरा स्वप्नील घोडे-पाटील यांनी फायटर ग्रुप च्या माध्यमातून आपल्या खांद्यावर घेतली आहे.

एकंदरीत झालेल्या श्री.विनय कोरे यांच्या विजयात कर्णसिंह यांचा सिंहाचा वाटा असला तरी, स्वप्नील घोडे-पाटील, वैभव चंद्रकांत नारकर, सुयश घोडे-पाटील, आणि यांचा सगळ्यात मोठा वाटा म्हणजे सुरेश नारकर आणि त्यांचे सहकारी. हि मंडळी नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिली आहेत. परंतु कामात मात्र या मंडळींनी कधीही हयगय केली नाही. आजवर दिलेली जबाबदारी इमाने-इतबारे पार पाडली. अशा या अशोक भाऊंच्या शिलेदारांना विसरून चालणार नाही.

स्वप्नील घोडे-पाटील हे नेतृत्व नेहमीच अबोल राहिलेलं नेतृत्व आहे. सामाजिक कामात अग्रेसर असलेलं हे तरुण नेतृत्व आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून निघालेलं आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांच्या या कामाची निश्चित किमत झाल्याशिवाय राहणार नाही, आणि या मळलेल्या वाटेचा एकदिवस राजमार्ग होईल.

नेहमीच साधालेल्याच पैरेकरी होण्यापेक्षा ज्यांच्यासोबत आहोत, त्यांच्याशी इमान राखण्याचा सल्ला भाऊंनी दिला होता. अशी हि मंडळी आजही भाऊंच्या तत्वांवर चालत आहेत. फायटर ग्रुप आता स्वप्नील यांच्या नेतृत्वाखाली शिस्तीच्या राजमार्गावरून चालत आहे. एकेकाळी स्व.अशोकभाऊ यांनी संजयदादांचे कटाउट लावून एकट्याने प्रचार केला होता, अशा भाऊंना संजयदादा प्रेमी जनता आजही विसरलेली नाही.

एकंदरीत काय अशोक भाऊंचे शिलेदार आजही भाऊंचे तत्व जपून वाटचाल करीत आहेत.

3+
3+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: