…अन पांढरा घोडा देखील गुलाबी झाला

बांबवडे : श्री विनयरावजी कोरे यांच्या विजयाने कर्णसिंह गायकवाड भान हरपून नाचले. हा आनंद होता,विजयाचा, हा आनंद होता पराभवाच्या दुष्ट चक्रातून बाहेर पडल्याचा, आणि हा आनंद होता नेत्यांनी दिलेल्या भेटीच्या काही अंशी का होईना उतराई होण्याचा, हा आनंद होता आजही एकनिष्ठ जनता संजयदादांना न विसरल्याचा. श्री विनय कोरे यांच्या विजयाने संजयदादा प्रेमी जनतेने विजयाचा गुलाल उधळला. कोणी म्हणत लोकांच्या गुलालात का रंगायचं हेच कारण आहे,इमान, याचं कारण आहे प्रामाणिकपणा,आणि याचं कारण आहे शब्द. अ आनंदात कर्णसिंह गायकवाड यांनी पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून नाचत आपला आनंद साजरा केला,आणि पाहता पाहता पांढरा शुभ्र घोडा गुलाबी झाला.

कर्णसिंह गायकवाड एक प्रामाणिक नेतृत्व, शब्दाला जागणारं नेतृत्व आहे. विनय कोरे यांनी त्यांना यंत्रमाग महामंडळावर उपाध्यक्ष पदी बसवलं, आणि कर्णसिंह यांच्या राजकारणाला पुन्हा नव्याने सुरुवात झाली. आपल्या नेत्याला गुलाल लावलेल्या व्यक्तिमत्वाच्या शब्दाला जागण्याची हि वेळ कार्यकर्त्यांची होती. त्यांनी आपलं संजायदादांवर आजही तितकंच प्रेम आहे, हे मतांद्वारे दाखवून दिलं आहे.

या सगळ्यांचा आनंद खूप मोठा आहे. या आनंदाच्या भरात पांढरा शुभ्र घोडा देखील गुलाबी झाला. त्याच घोड्यावरून आनंदाने बेभान झालेल्या नेत्याला पाहिलं, आणि स्व. संजयदादा यांच्या आत्म्याच्या डोळ्यांच्या कडा देखील आनंदाश्रुने पाणावल्या असतील.

अचानक आलेल्या परमेश्वराच्या बोलावण्याने, दादांचे आपल्या वारसदाराला तयार करण्याचे काम राहूनच गेलं होतं. ते काम श्री विनय कोरे यांनी पूरं केलं, आणि कर्णसिंह यांची यंत्रमाग महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी वर्णी लागली. हि गोष्ट सर्वसामान्य जनता अजून विसरलेली नाही. त्याची पोच पावती म्हणून कोरे साहेबांना मिळालेल्या मतांमध्ये खारीचा का होईना वाटा संजयदादा गटाचा आहे. या गटाच्या परीश्रामामध्ये बांबवडे येथील विष्णू यादव, सयाजी निकम आणि त्यांचे सहकारी,याचबरोबर स्व.अशोक भाऊ यांचे चि. स्वप्नील घोडे-पाटील,सुरेश नारकर, वैभव नारकर आणि त्यांचे सहकारी यांचादेखील सहभाग आहे.

5+
5+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: