प्लॅस्टिक निर्मुलनासाठी “ पिसाई ट्रेडर्स ” ला भेट द्या- लोहार बंधू

बांबवडे : सध्या आपल्या देशात प्लॅस्टिक निर्मुलन साठी देशस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. कारण प्लॅस्टिक चे दुष्परिणाम देखील समाजावर मोठ्या प्रमाणावर होवू लागले आहेत.  या देशकार्याला आपला देखील हातभार लागावा, हा हेतू मनाशी धरून आम्ही प्लॅस्टिक साठी पर्याय म्हणून वेगवेगळ्या प्लॅस्टिकविरहित पिशव्या पिसाई ट्रेडर्स च्या माध्यमातून निर्माण करीत आहोत. आणि त्या आपल्यापर्यंत पोहचवणे, हा मानस आहे. असे मत पिसाई ट्रेडर्स चे मालक सचिन लोहार,प्रदीप लोहार ( पिशवीकर )यांनी एसपीएस शी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, आपण सह्याद्रीच्या कुशीतील आणि निसर्गाच्या सहवासातील माणसे आहोत. विशेषतः शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील आपली जनता हि नेहमीच निसर्गावर प्रेम करीत आली आहे. तेंव्हा निसर्ग वाचविण्यासाठी प्लॅस्टिक मुक्ती हि काळाची गरज होवू लागली आहे. या प्लॅस्टिक पासून मुक्ती मिळण्यासाठी त्याला नवा पर्याय आम्ही नॉन व्होवेन बॅग, कागदी बॅग, कापडी बॅग अशा सर्व प्रकारच्या बॅग (पिशव्या ) वेगवेगळ्या साईझ मध्ये आपल्यासाठी घेवून येत आहोत. यामुळे काही अंशी का होईना प्लॅस्टिक पासून मुक्ती मिळण्यास मदत होईल. आपण दुकानात काही सामान आणण्यास गेलो कि, दुकानदाराकडे कॅरी बॅग ची मागणी करतो, आणि ती मिळते सुद्धा. परंतु त्याच्या वापराने आपण आपल्या देशाला प्रदूषणाच्या खाईत ढकलतो, हे आपल्याला लक्षात येत नाही. यासाठीच हा नवा पर्याय आम्ही घेवून येत आहोत. याचा उपयोग करून देशाला प्लॅस्टिक पासून मुक्ती मिळवण्यास सहकार्य करू.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी पिसाई ट्रेडर्स या व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही आपल्या भेटीला येत आहोत. तेंव्हा प्लॅस्टिक व्यतिरिक्त इतर प्लेन बॅग, प्रिंटींग सहित होलसेल दरात सुद्धा आपल्यासाठी उपलब्ध केल्या आहेत. एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता श्री विघ्नेश्वर, गणेशनगर,बांबवडे,ता. शाहूवाडी,जि.कोल्हापूर.  संपर्क क्र. ९४२१२८२३३५, ७३०१६७०८०८ असे आहेत. तेंव्हा नक्कीच संपर्क साधा, असे आवाहन लोहार बंधू (पिशवीकर ) यांनी केले आहे.

एकही संकल्प हमारा…

प्लॅस्टिक हटाना लक्ष हमारा.

2+
2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: